मागील काही वर्षापासून क्रिकेटविश्वात टी२० लीगचे फॅड सुरू झाले आहेत. अनेक देशांनी त्यांच्या देशांत टी२० लीग सुरू केल्या आहेत. त्यातच आता दक्षिण आफ्रिकेमध्ये आणखी एक टी२० लीग सुरू होणार आहे. याला आपण मिनी आयपीएल (छोटी इंडियन प्रीमियर लीग) म्हणू शकतो. कारण यामध्ये आयपीएलच्या ६ संघांच्या फ्रॅंचायजींनी संघ खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे.
दक्षिण आफ्रिकेत मिनी आयपीएल स्पर्धा होण्याची पूर्ण खात्री आहे. यासाठीचा लिलाव बुधवारी (१३ जुलै) झाला आहे. यामध्ये २९ गुंतवणूकदारांनी बोली लावली होती. यामध्ये आयपीएल संघमालकांनी सहभाग नोंदविला आहे. या लिलावामध्ये त्यांचेच वर्चस्व राहिले आहे.
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या टी२० लीग स्पर्धेसाठी सहा आयपीएल फ्रॅंचायजींनी संघ विकत घेतले असण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई इंडियंसचे मुकेश अंबानी, चेन्नई सुपर किंग्सचे एन श्रीनिवासन, दिल्ली कैपिटलचे पार्थ जिंदल, सनराइजर्स हैदराबादचे मारन, लखनऊ सुपर जाएंट्सचे संजीव गोयनका आणि राजस्थान रॉयल्सचे मनोज बडाले यांनी या लिलावामध्ये बोली लावली आहे. ही लीग पुढच्या वर्षी खेळली जाणार आहे.
या लीगच्या सीएसएने म्हटले, या महिन्याच्या शेवटी संघांची नावे जाहीर केली जाणार आहे. मात्र क्रिकबजने स्पष्ट केले की, संघांच्या मालकांना त्यांची यशस्वी ठरलेल्या बोलीची माहिती दिली आहे. तसेच संघांसाठी नावेही तयार आहेत. मुंबई इंडियन्स केपटाउन, चेन्नई सुपर किंग्जसाठी जोहान्सबर्ग आणि दिल्ली कॅपिटल्सच्या सहमालकाचा संघ सेंच्युरियन असणार आहे.
मुंबई आणि चेन्नईने या लिलावामध्ये लावलेली बोली अधिक मोठी ठरली आहे. त्यांनी २५० कोटी रुपयांच्या आसपास बोली लावल्याची शक्यता वर्तवली आहे. आयपीएलप्रमाणेच या लीगमध्येही प्रत्येक फ्रॅंचायजीला १० वर्षासाठी फ्रॅंचायजीच्या १० टक्के मानधन द्यावे लागणार आहे. लखनऊ संघमालक गोयंका यांनी दरबन फ्रॅंचायजीमध्ये रस दाखवला. तसेच हैद्राबादने पोर्ट एलिजाबेथ आणि राजस्थानने पार्ल या फ्रॅंचायजीं खरेदी करण्याची तयारी दाखवली.
या लीगमध्ये भारतीय गुंतवणूकदारांबरोबरच बाकी देशांतील गुंतवणूकदारांनीही भाग घेतला होता. त्यमध्ये केविन पीटरसनच्या संस्थेचा समावेश होता. मात्र आयपीएलच्या संघमालकांसमोर सर्व फिके पडल्यासारखे असल्याने या स्पर्धेला मिनी आयपीएल म्हणता येईल. या स्पर्धेतील संघांची नावे मात्र वेगळी असणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! विश्वचषकातील सुपर ओव्हरपूर्वी बेन स्टोक्स गेला होता सिगारेट प्यायला
ब्रेकिंग! या देशातील आणखीन एका दिग्गजाची निवृत्ती, क्रिकेटविश्वाला धक्का
विराट अवलंबणार ‘बॅक टू बेसिक्स’ मंत्र? खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी होणार मदत





