भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात रंगलेली ३ वनडे सामन्यांची मालिका अखेर संपन्न झाली आहे. अंतिम सामन्यात क्लीन स्वीप करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाला ३ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. परंतु युवा खेळाडूंनी या सामन्यात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तिसऱ्या वनडे सामन्यात संजू सॅमसनने तुफानी खेळी केल्याचे पाहायला मिळाले. तो अर्धशतक झळकावण्याच्या जवळ असताना श्रीलंकेच्या यष्टीरक्षकाने असे काही केले होते, ज्यामुळे संजू सॅमसनला माघारी परतावे लागले होते.
या सामन्यात इशान किशनऐवजी संजू सॅमसनला वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. या संधीचा दोन्ही हातांनी स्वीकार करत त्याने ४६ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि १ खणखणीत षटकार लगावला. पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक पूर्ण करण्यासाठी अवघ्या ४ धावा शिल्लक असताना, यष्टीरक्षक मिनोद भानुकाच्या हुशारीमुळे त्याला माघारी परतावे लागले आहे.
झाले असे की, पहिल्या डावातील १९ वे षटक सुरू असताना संजू सॅमसन फलंदाजी करत होता, तर श्रीलंका संघाकडून जयविक्रमा गोलंदाजी करत होता. त्यावेळी मिनोद भानुकाला आधीच कल्पना आली होती की, संजू सॅमसन काय करणार आहे. त्यावेळी त्याने गोलंदाज जयविक्रमाला आपल्या भाषेत काहीतरी म्हटले, कदाचित त्याने पुढचा चेंडू कसा टाकावा याबाबत सल्ला दिला असावा. त्यानंतर संजू सॅमसनने पुढे येऊन कव्हरच्या वरून शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो नियंत्रणात नसल्यामुळे तो झेलबाद झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.(Minod bhanuka predicts sanju Samson move advices bowler just before his dismissal)
https://www.facebook.com/1318122584/videos/1058149008051302/
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉच्या ४९ आणि संजू सॅमसनच्या ४६ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ४७ षटकाअखेर २२५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाकडून अविष्का फर्नांडोने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली होती, तर भानुका राजपक्षाने बहुमुल्य ६५ धावांचे योगदान दिले. हा सामना श्रीलंका संघाने ३ गडी राखून आपल्या नावावर केला. तसेच या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
-विराटसेनेला दुखापतींनी घेरले; भारतीय दिग्गज म्हणाले, भुवीसह ‘या’ ३ खेळाडूंना इंग्लंडला पाठवा
-“आधी बाबर आजमला २०-३० हजार धावा करु द्या, मग त्याची तुलना विराट कोहलीशी करा”