अमेरिकेत सध्या टी-२० माइनर क्रिकेट लीग खेळली जात आहे. भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार उन्मुक्त चंद ही या लीगमध्ये खेळत आहे. भारत सोडल्यानंतर उन्मुक्त अमेरिकेत स्थायिक झाला आहे. मायनर क्रिकेट लीगमध्ये सिलिकॉन वॅली स्ट्रायकर्स संघासाठी त्याने जबरदस्त खेळी केली आहे. हॉलीवुड मास्टर ब्लास्टर्स संघाविरुद्धच्या या सामन्यात त्याने स्वतःचे अर्धशतकही पूर्ण केले आहे.
मायनर क्रिकेट लीगच्या (Minor league cricket) चालू हंगामात उन्मुक्त चंद (Unmukt Chand) याने सलग दोन सामन्यात दोन अर्धशतके ठोकली आहेत. हॉलीवुडविरुद्धच्या या सामन्यात सिलिकॉन वॅलीने नाणेफेक गमावली आणि त्यांना प्रथम फलंदाजी करावी लागली. उन्मुक्त डावाची सुरुवात करण्यासाठी उतरला, पण संघाला पहिला झटका अवघ्या २० धावांवर बसला. परंतु दुसऱ्या विकेटसाठी श्रीलंकेचा शेहान जयसूर्यासोबत उन्मुक्तने ७२ धावा केल्या आणि संघाचा डाव सांभाळला. त्याने २५ चेंडूत २६ धावा केल्या.
यादरम्यान २९ वर्षीय उन्मुक्तने स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले आणि शेवटपर्यत खेळपट्टीवर टिकून राहिला. उन्मुक्तने संघासाठी ६५ चेंडूत १४५ च्या स्ट्राईक रेटने ९४ धावांचे योगदान दिले.
https://www.instagram.com/p/CfRhUkEgRfS/
सिलिकॉन वॅली संघाकडून प्रिसमने देखील महत्वाच्या २६ धावा ठोकल्या. त्याने या धावा अवघ्या १० चेंडूत तीन षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने केल्या. प्रत्युत्तरात हॉलीवुड संघाने सुरुवात चांगली केली, पण नंतर त्यांच्या फलंदाजांनी एकापाठोपाठ एक विकेट्स गमावल्या. हॉलीवुडने एका वेळी ५८ धावांवर फक्त एक विकेट गमावली होती, पण नंतर ते २० षटकांमध्ये ९ विकेट्सच्या नुकसानावर अवघ्या ११७ धावा करू शकले. सलामीवीर फलंदाज म्रुणाल पटेलने सर्वाधिक ३४ धावांचे योगदान दिले.
हॉलीवुडसाठी निसर्ग पटेलने २४ आणि कोडी चेटीने २० धावांचे योगदान दिले. वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रवल्करने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि ४ षटकात १७ धाव देऊन ५ विकेट्स घेतल्या. नाबाद ९४ धावांची खेळी केल्यामुळे उन्मुकला सामनावीर निवडले गेले. त्यानंतर खेळल्या गेलेल्या एका दुसऱ्या सामन्यात उन्मुक्तने सॉकल संघाविरुद्ध ३४ चेंडूत ५३ धावा केल्या. या प्रदर्शानसाठी देखील त्याला सामनावीर निवडले गेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दु:खद! ऑलिंपिक विजेत्या वरिंदर सिंग यांचे निधन, विश्वचषक विजेत्या हॉकी संघाचा होते भाग
बिग ब्रेकिंग! इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ओएन मॉर्गन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
काहीतरी शिजतंय? इंग्लंडच्या महिला क्रिकेटरसोबत लंडनमध्ये फिरतोय अर्जुन, डिनर डेटचे फोटो चर्चेत






