भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमची बरोबरी केली आहे. पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे तर महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीत सर्वाधिक धावा करण्याचा आता मिताली राजच्या नावावर आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर ४६३ सामन्यांत ४४.८३च्या सरासरीने १८४२६ धावा आहेत. त्यात ४९ शतके आणि ९६ अर्धशतकांचा समावेश आहे. मिताली राजनेही हा अनोखा विक्रम महिला क्रिकेटमध्ये आपल्या नावावर केला आहे. तिने महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८३ सामन्यांत ५१.७९ च्या सरासरीने ६००८ धावा केल्या आहेत. त्यात ४८ अर्धशतके आणि ५ शतकांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे आता हे दोंन्ही विक्रम भारताच्या नावावर झाले आहेत.