इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या महिला विश्वचषकात मिताली राज स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरू शकते. भारतीय संघाचं जबदस्त नेतृत्व करत अंतिम फेरीपर्यंत पोहोचवणाऱ्या मितालीने फलंदाजीमध्येही जबदस्त कामगिरी केली आहे.
९ सामन्यात मितालीने ४५.४४ च्या सरासरीने ४०९ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॅमी बोमोंटपेक्षा मितालीने फक्त एक धाव कमी केली आहे. टॅमी बोमोंटने ९ सामन्यात ४५.५५ च्या सरासरीने ४१० धावा केल्या आहेत. परंतु मिताली राजने स्पर्धेत १ शतक आणि ३ अर्धशतके केली आहेत.
जर भारताने हा विश्वचषक जिंकला तर मिताली राजलाच हा पुरस्कार मिळू शकतो. परंतु जर इंग्लंड हा विश्वचषक जिंकले तर मिताली आणि टॅमी बोमोंट यापैकी कुणाला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार द्यायचे हा मोठा प्रश्न असेल.