पुणे : मितांश राणे (मुंबई) आणि यशश्री कुबडेची (नागपूर) सुरत (गुजरात) येथे 23 ते 30 जुलै रोजी होणाऱ्या दुसऱ्या हॉकी इंडिया सब-ज्युनियर पुरुष आणि महिला वेस्ट झोन हॉकी 2024 स्पर्धेमध्ये हॉकी महाराष्ट्र सब-ज्युनियर मुले आणि मुली संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
मुले गटात हॉकी महाराष्ट्र संघाचा हॉकी मध्य प्रदेश आणि हॉकी राजस्थान संघासोबत अ गटात मध्ये आहे, तर ब गटामध्ये दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव हॉकी छत्तीसगड हॉकी, हॉकी गुजरात आणि गोवा हॉकी हे संघ आहेत.
मुले गटात 7 संघ असून ते दोन गटामध्ये विभागले गेले आहेत. ते राऊंड रॉबिन (लीग) पद्धतीने खेळताना अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
पुण्याचे एकूण पाच खेळाडू ध्रुव शहा, प्रथम पटियाल; साक्षांक गोरे; नीलकांत देवळे आणि सूरज शुक्ला यांची मुले संघात निवड झाली आहे
दरम्यान, 18 जणांच्या मुलींच्या संघात पुण्याच्या स्वानंदी कदम, मानवी जुवळे, अन्वी रावत, जान्हवी चव्हाण, अर्पिता सरोदे आणि सारा राणे अशा सहा जणी आहेत.
मुली गटात हॉकी मध्य प्रदेश, छत्तीसगड हॉकी, हॉकी राजस्थान, गोवा हॉकी यजमान हॉकी गुजरात आणि हॉकी महाराष्ट्र अशा एकूण 6 संघांचा समावेश असलेल्या राऊंड रॉबिन (ऑल-प्ले-ऑल) लीगमध्ये प्रत्येक गटामधील टॉप-4 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
हॉकी महाराष्ट्र मुली संघ मंगळवार, 23 जुलै 2024 रोजी राजस्थान हॉकी विरुद्ध पहिला सामना खेळेल. मुले गटाची सलामीची लढत हॉकी मध्य प्रदेश बुधवार 24 जुलै 2024 रोजी होईल.
दोन्ही संघांचे 15 दिवसांचे निवड-कम-कंडिशनिंग शिबीर मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे ऑलिम्पियन अजित लाक्रा आणि विक्रम पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
रविवारी सकाळी दोन्ही संघ सुरतला रवाना झाले
संघ :
मुले: झेऊस धर्माई (मुंबई – गोलकीपर); रेहान मनुसुरी (नाशिक – गोलकीपर); वेदांत ढोके (नागपूर); ध्रुव शहा (पुणे); मितांश राणे (मुंबई – कर्णधार); सार्थ शिंदे (सांगली); प्रियांशू विचारे (मुंबई); सिद्धार्थ ठाकूर (मुंबई); प्रथम पटियाल (पुणे); करण वाघमरे (नांदेड); साक्षांक गोरे (पुणे); नीलकांत देवळे (पुणे); सूरज शुक्ला (पुणे); राजवर्धन पाटील (सांगली); ज्ञानेश विजकापे (मुंबई); जॉर्डन डेसमंड (मुंबई); आमोद घाडगे (मुंबई); रेहान खान (जळगाव).
प्रशिक्षक : भूषण ढेरे (पुणे), व्यवस्थापक : गणेश उखिर्डे (पुणे)
मुली: अंबर सय्यद (नाशिक – गोलकीपर); अनुष्का चव्हाण (सातारा – गोलकीपर); स्वानंदी कदम (पुणे); क्लो कॅस्टेलिनो (मुंबई); श्रावणी तुळणकर (नागपूर); न्यासा कौटिन्हो (मुंबई); निकिता वेताळ (सातारा); अनुष्का केंजळे (सातारा); तेजस्विनी कर्वे (सातारा); श्रेया चव्हाण (सातारा); मानवी जुवळे (पुणे); अन्वी रावत (पुणे); जान्हवी चव्हाण (पुणे); अर्पिता सरोदे (पुणे); शेझेल कौटिन्हो (मुंबई); तलेसा वाझ (मुंबई); यशश्री कुबडे (नागपूर – कर्णधार); सारा राणे (पुणे).
प्रशिक्षक : चेताली दुबारकर (पुणे), व्यवस्थापक : विराज निमुणकर (ठाणे)