दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. दोन्ही संघांना एकदाही जेतेपद मिळवता आले नव्हते. त्यामुळे पहिले वहिले जेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. परंतु या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ८ विकेट्सने बाजी मारली आणि आयसीसी टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयासह ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मिचेल स्टार्क आणि त्याची पत्नी ॲलीसा हेलीच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
विश्वचषक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि देशाला विश्वचषक जिंकून देणे, या दोन्हीही खूप खास गोष्टी आहेत. परंतु तुम्ही कधी असं ऐकलं आहे का, की पती आणि पत्नी यांनी एकाच संघासाठी विश्वचषक स्पर्धेत देशाला मिळवून दिला आहे. असं ऑस्ट्रेलिया संघांच्या या जोडीबाबतीत घडलं आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि ऑस्ट्रेलिया महिला संघाची यष्टिरक्षक फलंदाज ॲलीसा हेली यांनी दोघांनी ऑस्ट्रेलिया संघाला विश्वचषक स्पर्धा जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. यासह हे जोडपे लग्नांनंतर आपल्या देशाला विश्वचषक स्पर्धा जिंकून देणारे पहिले आणि एकमेव जोडपे ठरले आहे.
मिचेल स्टार्क आणि ॲलीसा हेली हे दोघेही २०१६ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. त्यानंतर २०१८ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत आणि २०२० मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवून देण्यात ॲलीसा हेलीने मोलाचे योगदान दिले होते. तसेच टी-२० विश्वचषक स्पर्धेत २०२१ स्पर्धेत मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवून दिला आहे.
मिचेल स्टार्क आणि ॲलीसा हेली यांचा २०१५ मध्ये साखरपुडा झाला होता. त्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये हे दोघेही विवाह बंधनात अडकले होते. विवाह झाल्यानंतर या दोघांच्या नावे आणखी एका खास विक्रमाची देखील नोंद झाली होती. मिचेल स्टार्क आणि ॲलीसा हेली यांची तिसरी जोडी होती, ज्यांना विवाह झाल्यानंतर देशासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचा मान मिळाला होता.
महत्वाच्या बातम्या –
नव्या टी२० विश्वविजेत्यांचं कौतुक! क्रिकेटविश्वातून ऑस्ट्रेलियावर शुभेच्छांचा पाऊस, पाहा ट्वीट्स