ऑस्ट्रेलियाला विश्वचषक 2023 मधील आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावे लागले आहेत. त्यांना पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने सहा गडी राखून मात दिली होती. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तब्बल 137 धावांनी त्यांना पराभूत केले. या खराब कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया संघावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. असे असताना आता ऑस्ट्रेलियाचा प्रमुख अष्टपैलू मिचेल स्टार्क याने लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.
या स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच सलग दोन पराभव पहावे लागले. भारतीय संघाविरुद्ध विजयाची संधी असताना देखील खराब क्षेत्ररक्षणामुळे त्यांना हा सामना गमवावा लागला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तब्बल सहा झेल त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी सोडले. विशेष म्हणजे त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फलंदाज दोन्ही सामन्यात सपशेल अपयशी ठरले. ऑस्ट्रेलिया संघावर या सर्व गोष्टींवर टीका होत असताना आता संघाचा अनुभवी अष्टपैलू मिचेल मार्श समोर आला आहे. संघाच्या खराब कामगिरी विषयी प्रतिक्रिया देताना तो म्हणाला,
“ऑस्ट्रेलियाचा संघ ज्यावेळी एका बाजूला ढकलला जातो त्यावेळी तो अधिक विध्वंसक होतो आणि आपले सर्वोत्तम क्रिकेट खेळतो. सध्या आम्ही असेच काहीसे बाजूला गेलेलो आहोत.”
ऑस्ट्रेलिया संघाला आपला पुढील सामना आता श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे. ऑस्ट्रेलियाप्रमाणे श्रीलंका देखील आपले पहिले दोन सामने गमावून या सामन्यात उतरेल. हा सामना 16 ऑक्टोबर रोजी लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात ऑस्ट्रेलिया कशा प्रकारचा संघ उतरवते हे पाहणे महत्त्वाचे असेल.
(Mitchell Marsh Big statement on Australia Comeback In ODI World Cup)
हेही वाचा-
पाकिस्तानविरुद्ध भारताचा ‘हा’ गोलंदाज ठरेल गेमचेंजर; इंग्लंडच्या विश्वविजेत्या कर्णधाराला विश्वास
याला म्हणतात INDvsPAK सामन्याची क्रेझ! चाहत्यांनी स्टेडिअमबाहेर केली तुफान गर्दी, पाहा व्हिडिओ