---Advertisement---

RCB vs LSG: मिचेल मार्शने रचला इतिहास..! लखनऊसाठी अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू

On: मंगळवार, मे 27, 2025 10:37 PM
---Advertisement---

Mitchell Marsh: लखनऊच्या एकाना स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स (RCB vs LSG) यांच्यात हा सामना रंगला आहे. या सामन्यात एलएसजीचा सलामीवीर मिचेल मार्शने इतिहास रचला आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मार्शने फक्त 37 चेंडूत 67 धावा केल्या. यासह त्याने 2 मोठे रेकाॅर्ड आपल्या नावावर केले. (Mitchell Marsh creates history by scoring a half-century against RCB)

मिचेल मार्शने आरसीबीविरुद्धच्या 67 धावांच्या डावात 4 चौकारांसह 5 षटकार मारले. दरम्यान या हंगामात ही त्याची सातवी 50+ धावसंख्या होती. मार्श आता आयपीएलच्या एका हंगामात लखनऊ सुपर जायंट्ससाठी सर्वाधिक 50+ धावा करणारा फलंदाज बनला आहे. (Mitchell Marsh becomes the player to score the most 50+ runs for LSG)

आयपीएल 2025च्या १३ सामन्यांमध्ये मिचेल मार्शच्या बॅटमधून 627 धावा निघाल्या. यादरम्यान मार्शची सरासरी 48.23 आणि स्ट्राईक रेट 163.71 होता. मार्श आता आयपीएलच्या एका हंगामात लखनऊ सुपर जायंट्ससाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. याआधी हा रेकाॅर्ड केएल राहुलच्या नावावर होता. राहुलने आयपीएल 2022 मध्ये लखनऊसाठी 616 धावा केल्या होत्या. (Mitchell Marsh becomes LSG’s highest run-scorer in a season)

एका हंगामात लखनऊसाठी सर्वाधिक धावा-

627 – मिचेल मार्श (2025)
616 – केएल राहुल (2022)
520 – केएल राहुल (2024)
511* – निकोलस पूरन (2025)
508 – क्विंटन डी कॉक (2022)

लखनऊसाठी एका हंगामात 50 पेक्षा जास्त धावा
7 – मिचेल मार्श (2025)*
6 – केएल राहुल (2022)
5 – एडेन मार्कराम (2025)
5* – निकोलस पूरन (2025)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---