आयपीएलचा सोळावा हंगाम चांगल्या रंगतदार सामन्यांनी सुरू झाला आहे. स्पर्धेतील पहिल्या आठवड्यात विजेतेपदाचा दावेदार म्हणल्या जाणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला मात्र दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आधीच पराभवातून उभारी घेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असताना संघाला आणखी एक धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श याने तडकाफडकी मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला असून, तो आठवडाभरानंतर पुन्हा स्पर्धेत सहभागी होईल.
एका आघाडीच्या क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार,
‘मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. या आठवड्यात मार्श लग्न करत असून, लग्न पार पडल्यानंतर आठवडाभराने तो पुन्हा एकदा संघात सामील होईल. यासाठी फ्रॅंचाईजीने त्याला परवानगी दिलेली आहे.’
मार्श मागील वर्षी संपूर्ण आयपीएल स्पर्धेला मुकला होता. यावेळी चांगल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या मार्शला मात्र आपली छाप पाडता आली नाही. पहिल्या सामन्यात तो खातेही न खोलता शून्यावर बाद झाला. तर, सामन्यातही केवळ चार धावा करण्यात त्याला यश आले होते. मार्श परतल्याने दिल्ली संघात पुन्हा एकदा आक्रमक फलंदाज रोवमन पॉवेल पुनरागमन करेल. दिल्लीला आपला पुढील सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध गुवाहाटी येथे खेळायचा आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाची मदार फलंदाजीमध्ये कर्णधार डेव्हिड वॉर्नर व पृथ्वी शॉ यांच्यावर असेल. रायली रूसो आणि सर्फराज खान यांना देखील फलंदाजीत योगदान द्यावे लागणार आहे. गोलंदाजीमध्ये फिरकीपटू कुलदीप यादव हा आपला प्रभाव पाडण्यात बिलकुल अपयशी ठरला. वेगवान गोलंदाजीत खलील अहमद व एन्रिक नोर्कीए यांच्याकडून संघाला पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
(Mitchell Marsh Flying Back Home For His Wedding He Miss One Week Action For Delhi Capitals In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सपेक्षाही जास्त ‘ही’ टीम उधळते चीअरलीडर्सवर पैसा, दुसऱ्या स्थानावर RCB
डेथ ओव्हर्समध्ये ‘हा’ चेंडू गोलंदाजांचे सर्वात मोठे हत्यार, प्रशिक्षक ब्रावोची मोठी प्रतिक्रिया