वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 36वा सामना शनिवारी (दि. 04 नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार अष्टपैलू इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. याची माहिती स्वत: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली आहे. चला तर, यामागील कारण जाणून घेऊयात…
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडलेला ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू इतर कुणी नसून मिचेल मार्श (Mitchell Marsh) आहे. मिचेल मार्श मायदेशी परतला आहे. तो पर्थ येथील आपल्या घरी परतला आहे. त्याने हा निर्णय वैयक्तिक कारणांमुळे घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मार्शच्या रूपात ऑस्ट्रेलियाला विश्वचषकातील दुसरा धक्का बसला आहे. त्याच्याआधी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) हादेखील सोमवारी (दि. 30 ऑक्टोबर) कनकशनमुळे इंग्लंडविरुद्ध खेळण्याची शक्यता नाहीये.
ऑस्ट्रेलियाने दिली माहिती
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी (दि. 02 नोव्हेंबर) निवेदन जारी करत सांगितले की, मार्श बुधवारी (दि. 01 नोव्हेंबर) सायंकाळी मायदेशी परतला आहे. त्यांनी म्हटले की, “ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श हा आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेतून काल रात्री वैयक्तिक कारणामुळे मायदेशी परतला आहे. त्याचे संघात परतण्याची वेळ निश्चित केली जाणार आहे. सध्या याविषयी जास्त माहिती दिली जाणार नाही.”
Mitch has returned home for personal reasons and is out of the World Cup indefinitely. pic.twitter.com/jIy2LGJkcI
— Cricket Australia (@CricketAus) November 2, 2023
नेदरलँड्स आणि न्यूझीलंड संघाविरुद्धच्या सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर असलेला अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस संघात परतण्याची शक्यता आहे. तसेच, मार्नस लॅब्युशेन हा मधली फळी सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडे फक्त 13 तंदुरुस्त खेळाडू असतील. त्यासोबतच त्यांच्याकडे सीन ऍबॉट आणि ऍलेक्स कॅरे हेदेखील खेळाडू संघात उपलब्ध असतील.
मिचेल मार्शच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. मात्र, मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल हे विस्फोटक खेळाडू इंग्लंडविरुद्ध खेळणार नसल्याने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.
ऑस्ट्रेलिया संघ लयीत परतला असताना या दोन खेळाडूंचे नसणे संघासाठी चिंतेची बाब आहे. संघाने आतापर्यंत 6 सामने खेळले असून त्यातील 4 सामने जिंकले आहेत. ते 8 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहेत. (Mitchell Marsh has returned home for personal reasons and is out of the World Cup indefinitely)
हेही वाचा-
न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारताच टेम्बा बावुमाची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘उशीरपर्यंत टिकल्यामुळे…’
ग्लेन फिलिप्सची एकाकी झुंज अपयशी! दक्षिण आफ्रिकेची गुणतालिकेतील झेप विजयापेक्षाही मोठी