मिचेल मार्शच्या (Mitchell Marsh) पहिल्या आयपीएल शतकामुळे आणि निकोलस पुरणच्या (nicolas pooran) या हंगामातील पाचव्या अर्धशतकामुळे लखनऊने गुजरात टायटन्स (GT vs LSG) विरुद्ध 2 विकेट गमावून 235 धावसंख्या उभारली. मार्शने 64 चेंडूत 10 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 117 धावा केल्या. तसेच निकोलस पुरणने 27 चेंडूत नाबाद 56 धावांची शानदार पारी खेळली. दोघांनी दुसरी विकेट पडेपर्यंत 121 धावांची भागीदारी रचली.
मिचेल मार्शने 12 व्या रशीद खानच्या षटकात 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 25 धावा लुटल्या, त्याच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर 56 चेंडूत मिचेल मार्श100 धावांपर्यंत पोहोचला.
मिचेल मार्शने 56 चेंडूत शतक झळकावून चांगलाच विक्रम रचला. गुजरात विरुद्ध शतक झळकावून मिचेल मार्शने त्याने त्याचं नाव इतिहासाच्या पानांवर कोरले आहे. या शतकाबरोबरच मिचेल मार्श या आयपीएल 2025 (IPL 2025) हंगामात शतक झळकावणारा पहिला विदेशी खेळाडू ठरला आहे. याचबरोबर त्याच्या नावावर अजून एक विक्रम झाला आहे. आता तो एका हंगामात के एल राहुल नंतर लखनऊसाठी सर्वात जास्त वेळा 50 पेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू देखील ठरला आहे.
याआधी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने (shubman gill) नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (narendra modi stadium) लखनऊ (LSG) विरुद्ध टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जरी प्लेऑफची रेस संपली असली तरी सुद्धा, गुजरातसाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. उरलेल्या सात सामन्यात हे निश्चित होईल की, आरसीबी (RCB), पंजाब (PBKS ), मुंबई (Mi) आणि गुजरात (GT) या संघांमधील वरच्या दोन संघांमध्ये कोण टिकून राहील.






