---Advertisement---

पाकिस्तान पुन्हा ट्रोल! न्यूझीलंडच्या गोलंदाजाने खेळपट्टीची उडविली खिल्ली, ट्वीट होतय व्हायरल

On: सोमवार, जानेवारी 2, 2023 2:29 PM
Babar Azam and Tim Southee
---Advertisement---

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (PAKvNZ)यांच्यात मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जात आहे. कराची येथे सोमवारपासून (2 जानेवारी) सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचे दुसरे सत्र सुरू असून न्यूझीलंडने एक विकेटच्या नुकसानावर 170 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. धावांचा हा पाऊस पाहता न्यूझीलंडच्या गोलंदाजाने खेळपट्टीची खिल्ली उडवली आहे.

न्यूझीलंडने पहिल्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी केली. तेव्हा त्यांचा रनरेट जवळपास 4 एवढा होता. पाकिस्तानची सपाट खेळपट्टी पाहून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मिशेल मॅक्लेनघन याने ट्वीट करत म्हटले, ‘किती परिपूर्ण रस्ता. फलंदाजांचे स्वप्न!’

https://twitter.com/Mitch_Savage/status/1609787347541045248?s=20&t=s9G7HdaVgj8wYzIJ2qvYcw

पाकिस्तान मागील अनेक महिन्यांपासून त्यांच्या खेळपट्टीमुळे ट्रोल होत आहे. 2022मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांनी दौरा केला आहे. आता डिसेंबर महिन्याच्या शेवटी न्यूझीलंड संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे. या तिन्ही संघाविरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये पाकिस्तानने सपाट खेळपट्टीवरच सामने खेळवले. याचा परिणाम म्हणून यजमान एकही सामना जिंकला नाही. तसेच पहिल्यांदाच पाकिस्तानने घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावण्याचा विक्रमही केला.

पहिले पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0, नंतर इंग्लंडने 3-0 असे पराभूत केले. यामध्ये सर्व फलंदाजांनी धावांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. इंग्लंडच्या एका खेळाडूने तर लागोपाठ तीन शतके ठोकली होती. तसेच पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तर तब्बल सात खेळाडूंनी शतकी खेळी केल्या होत्या. तर न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात केन विलियम्सन (Kane Williamson) याने द्विशतक केले होते.

न्यूझीलंडच्या पहिल्या डावात टॉम लॅथम (Tom Latham) 100 चेंडूत 71 धावा करत बाद झाला. डेवॉन कॉनवे 89 आणि विलियम्सन 16 धावा करत खेळपट्टीवर आहेत. या मालिकेत दोन कसोटी सामने खेळले जात असून पाहुणा संघ टीम साऊदी याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हॉकीचा वर्ल्डकप येतोय! जाणून घ्या भारताचे वेळापत्रक, संघ एकाच क्लिकवर
बीसीसीआयच्या निर्णयावर आयपीएल फ्रॅंचायजींचे प्रत्युत्तर! म्हणाले, ‘ते असे नाही म्हणू…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---