मागील वर्षी आयपीएलमध्ये अनेक रोमांचक सामने झाले. काही सामन्यांनी तर चाहत्यांना आश्चर्यचकीत केले होते. आपण सर्वांनी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मैदानावर नेहमी शांत असलेले पाहिले आहे. परंतु आयपीएलच्या मागील मोसमातील एका सामन्यात धोनीचे एक वेगळेच रुप पहायला मिळाले होते.
खरंतर तो सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संंघामध्ये खेळण्यात आला होता. सीएसके विजयापासून काहीच धावा दूर होता. तेवढ्यात धोनी थेट मैदानामध्ये आला होता. हे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.
त्या सामन्यात सीएसकेला विजयासाठी १८ धावांची आवश्यकता होती. यानंतर सीएसकेच्या फलंदाजांनी मोठ-मोठे शॉट्स लावले त्यानंतर संघाला शेवटच्या ३ चेंडूत ८ धावांची आवश्यकता होती. बेन स्टोक्स गोलंदाजी करत होता. त्याने चेंडू टाकला जो फलंदाजाच्या कमरेच्या वर होता. तेवढ्यात पंचाने हात वर करत नो बॉलचा इशारा केला. त्यानंतर लगेच आपला निर्णय बदलला.
यामुळे सीएसके संघाचे संपूर्ण संघव्यवस्थापन रागात होता. या घटनेबाबत चर्चा करण्यासाठी धोनी डगआऊटमधून थेट पंचाकडे गेला. त्यावेळी सीएसकेचा मिचेल सँटनरदेखील (Mitchell Santner) मैदानावर उपस्थित होता.
सीएसकेबरोबरच्या इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये त्याने याबद्दल खुलासा केला की, तोदेखील इतर लोकांप्रमाणे आश्चर्यचकीत झाला होता. धोनी खूप शांत आहे. परंतु त्यादिवशी त्याला पाहून तो आश्चर्यचकीत होता.
धोनी चिडला वगैरे नव्हता. तो केवळ पंचाबरोबर चर्चा करण्यासाठी मैदानावर आला होता. एकदा पंचाने निर्णय दिल्यावर ते परत घेऊ शकत नाहीत. तरी यानंतर शेवटच्या चेंडूवर त्याने षटकार मारला आणि सीएसकेने तो सामना जिंकला होता, असे सँटनर म्हणाला.
“धोनीने सामना संपल्यानंतर पंचाची माफी (Apologize) मागितली होती. सामना संपल्यानंतर थोड्या वेळात मी धोनीला पंचाबरोबर पाहिले. निश्चितच धोनीला माहित होते की, त्याला मैदानावर जाण्याची परवानगी नाही. परंतु तरीही त्याने तसे केले. यानंतर त्याने आपल्या चूकीबद्दल माफी मागितली,” असे अष्टपैलू क्रिकेटपटू सँटनर पुढे म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-मी कधीही विचार केला नव्हता, पण ती गोष्ट धोनीकडून घडली होती
-चौथ्या क्रमांकावर आश्चर्यकारक निवड करत अशी झाली आयपीएल ड्रीम ११






