वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 16व्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने-सामने आहेत. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी करत अफगाणिस्तान समोर या सामन्यात 289 धावांचे लक्ष्य ठेवले. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव गडगडला. मात्र, त्याचवेळी न्यूझीलंडचा अष्टपैलू मिचेल सॅंटनर याने एक अशक्यप्राय झेल टिपला.
विजयासाठी मिळालेल्या 289 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचे दोन्ही सलामीवीर केवळ 27 धावांवर माघारी परतले. त्यानंतर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी व रहमत शहा यांनी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मिचेल सॅंटनर याने एक अफलातून झेल टिपत शाहिदीची खेळी संपुष्टात आणली.
https://www.instagram.com/reel/CyivhRBP2-w/?igshid=MzRlODBiNWFlZA==
लॉकी फर्ग्युसन याने टाकलेल्या चौदाव्या षटकातील अखेर चेंडू आखूड टप्प्याचा आल्यानंतर शाहिदीने पुल करण्याचा प्रयत्न केला. हवेत उडालेला हा चेंडू स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या सॅंटनरपासून काहीशा अंतरावर होता. त्याने धावत जाऊन योग्य अंदाज घेत हा झेल पूर्ण केला. हा स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल असल्याचे बोलले जात आहे.
(Mitchell Santner Took Stunner Of Shahidi Against Afghanistan ODI World Cup)
हेही वाचा-
नाद केला पण पुरा केला! न्यूझीलंडच्या पठ्ठ्यानं गाजवलं 2023 वर्ष, वनडेत ठोकल्या ‘एवढ्या’ धावा
हेही वाचा-
BREAKING: रोहित शर्मावर ट्रॅफिक पोलिसांची मोठी कारवाई, मुंबई-पुणे हायवेवर हिटमॅनच्या लॅम्बोर्गिनीचा थरार
शाब्बास रे पठ्ठ्या! ICC ODI Rankingमध्ये रोहितचा धमाका, ‘या’ क्रमांकावर झेप घेत सर्वांनाच केले हैराण