क्रिकेट जगतातील सर्वात प्रतिष्ठित ऍशेस कसोटी मालिका (Ashes Test Series) सध्या ऑस्ट्रेलियात खेळली जात आहे. मालिकेतील दुसरी दिवस-रात्र स्वरूपाची कसोटी ऍडीलेड (Adelaide Day-Night Test) येथे सुरू आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर यजमान ऑस्ट्रेलियाकडे मोठी आघाडी असून, ते सलग दुसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील असतील. याचवेळी तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने एका खास विक्रमाला गवसणी घातली.
स्टार्कने केला मोठा कारनामा
स्टार्कने कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात सलामीवीर रॉरी बर्न्सला बाद करून ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले होते. त्यानंतर, तिसऱ्या दिवशी ८० धावांवर खेळत असलेल्या डेविड मलानचा बहुमोल बळीही त्याने मिळवला. यानंतरही, हा डावखुरा वेगवान गोलंदाज थांबण्याच्या मनःस्थितीत नव्हता. कारण, त्याने यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर आणि स्टुअर्ट ब्रॉडला बाद करून आपल्या खात्यात चार बळींची नोंद केली. त्याने या डावात १६ षटके टाकत ३७ धावांत ४ गडी बाद केले. यासह तो दिवस-रात्र कसोटी सामन्यात गुलाबी चेंडूने ५० बळी घेणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिला गोलंदाज ठरला. (Mitchell Starc Become First Bowler Who Took 50 Wickets In Day-Night Test) त्याने नवव्या सामन्याच्या सोळाव्या डावात ही कामगिरी करून दाखवली.
ऑस्ट्रेलियाने २०१५ पासून आजतागायत ८ दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी या सर्व सामन्यांत विजय संपादन केला आहे. तसेच या सामन्यातही ते आघाडीवर आहेत. (Australia Won All Day-Night Test)
तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया आघाडीवर
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात इंग्लंडवर मोठी आघाडी घेतली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने त्यांच्या दुसऱ्या डावात ४५ धावा केल्या आहेत आणि १ बळी देखील गमावला आहे. सलामीवीर डेविड वॉर्नर १३ धावा करून तंबूत परतला आहे. ऑस्ट्रेलिया सध्या २८२ धावांनी आघाडीवर आहे. अजूनही सामन्याचे दोन दिवस शिल्लक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वविजेत्या खेळाडूची निवड समितीवर जहरी टीका; म्हणाला, “यांनी विराटच्या…”
पीवायसी-पुसाळकर पीवायसी प्रीमियर क्रिकेट लीग 2021 स्पर्धेत टस्कर्स, जॅगवॉर्स संघांचा सलग तिसरा विजय
विश्वविजेत्या खेळाडूची निवड समितीवर जहरी टीका; म्हणाला, “यांनी विराटच्या…”