ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात मोठा विक्रम रचला आहे. स्टार्क आता वर्ल्ड कपच्या इतिहासात (एकदिवसीय आणि टी20) सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्यानं श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला.
स्टार्कनं वनडे आणि टी20 विश्वचषकात मिळून एकूण 95 विकेट्स घेतल्या आहेत. तर लसिथ मलिंगाच्या नावे 94 विकेट्स आहेत. या लिस्टमध्ये बांग्लादेशचा शाकिब अल हसन तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याच्या नावावर विश्वचषकात एकूण 92 विकेट्स आहेत. यानंतर न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आणि श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनचा क्रमांक लागतो.
विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज –
95 – मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
94 – लसिथ मलिंगा (श्रीलंका)
92 – शाकिब अल हसन (बांग्लादेश)
87 – ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड)
79 – मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
बांग्लादेश विरुद्धच्या सुपर 8 सामन्यात मिचेल स्टार्कनं 4 षटकात 21 धावा देऊन 1 विकेट घेतली. तर वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सनं 29 धावांत 3 बळी घेत शानदार कामगिरी केली. फिरकीपटू ॲडम झाम्पानं 2 विकेट घेतल्या. या सामन्यात बांग्लादेशनं प्रथम फलंदाजी करताना 140 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियानं 11.2 षटकांत 2 गडी गमावून 100 धावा केल्या. दरम्यान, पावसानं खोळंबा घातला. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आलं.
बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सनं ऐतिहासिक कामगिरी केली. तो टी20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा केवळ दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी ब्रेट ली यानं 2007 च्या टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी हॅट्ट्रिक घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीचा विश्वविक्रम धोक्यात, सूर्यकुमार यादवनं अवघ्या 64 सामन्यांत रचला इतिहास!
टी20 विश्वचषक 2024 मधील पहिली हॅट्ट्रिक! ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामन्यात घडला इतिहास
भारताच्या अफगाण विजयाचे 5 नायक, टीम इंडियाच्या या खेळाडूंनी निभावली महत्त्वाची भूमिका