---Advertisement---

मिशेल स्टार्कच्या या दबरदस्त यॉर्करने स्टोक्स झाला क्लीन बोल्ड! पहा व्हिडिओ

On: बुधवार, जून 26, 2019 2:11 PM
---Advertisement---

लंडन। 2019 क्रिेकेट विश्वचषकातील 32 वा सामना मंगळवारी (25 जून) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात लॉर्ड्सवर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 64 धावांनी विजय मिळवला. याबरोबरच ऑस्ट्रेलियाने या विश्वचषकातील उपांत्य फेरीतील प्रवेशही निश्चित केला.

ऑस्ट्रेलियाच्या या विजयात जेसन बेऱ्हेंन्डॉर्फ आणि मिशेल स्टार्कने मिळून इंग्लंडच्या 9 फलंदाजांना बाद करत महत्त्वाचा वाटा उचलला. बेऱ्हेंन्डॉर्फने 5 विकेट घेतल्या. तर स्टार्कने 4 विकेट घेतल्या. स्टार्कने घेतलेल्या 4 विकेटपैकी एक विकेट बेन स्टोक्सची घेतली. स्टार्कने स्टोक्सला बाद करताना टाकलेल्या यॉर्करचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना दिलेल्या 286 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून स्टोक्सने 89 धावांची चांगली लढत दिली होती.

पण त्याची ही लढत 37 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर स्टार्कने 145 किलोमीटर प्रती तास वेगाने इनस्विंगिंग यॉर्कर टाकत संपुष्टात आणली. स्टार्कने टाकलेल्या या यॉर्कर चेंडूने ऑफ स्टंम्पवरील बेल्स उडवले. त्यामुळे स्टोक्सला त्याची विकेट गमवावी लागली.

स्टोक्सने खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर असे बाद झालेले पाहुन त्याची नाराजी उघडपणे व्यक्त करताना हातातील बॅट सोडली आणि पायाने ती दूर ढकलली. त्यानंतर तो ती बॅट उचलून मैदानाबाहेर गेला. स्टार्कच्या या यॉर्करचा व्हिडिओ आयसीसीने ट्विटरवर शेअर केला आहे.

https://twitter.com/ICC/status/1143565526993649664

या सामन्यात इंग्लंडला 286 धावांचा पाठलाग करताना 44.4 षटकात सर्वबाद 221 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून स्टोक्स व्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलंदाजाला 30 च्यावर धावा करता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून बेऱ्हेंन्डॉर्फ आणि स्टार्क व्यतिरिक्त स्टॉयनिसने 1 विकेट घेतली.

तसेच त्याआधी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 285 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार ऍरॉन फिंचने 100 धावांची शतकी खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच जोफ्रा आर्चर, मार्क वूड, बेन स्टोक्स आणि मोईन अलीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

अशी आहेत विश्वचषक २०१९च्या सेमीफायनलमध्ये राहिलेल्या ३ जागांसाठीची समीकरणं

टीकाकारांचा धनी ठरलेल्या धोनीच्या मदतीला आला त्याचाच पहिला कर्णधार

३६ वर्षांपुर्वी कपिल देवच्या टीम इंडियाने करोडो भारतीयांची स्वप्ने पुर्ण केली होती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment