झिम्बाब्वे क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात (AUSvsZIM) तीन सामन्यांची वनडे मालिका खेळला. तर ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे क्रिकेट संघासाठी शनिवार (3 सप्टेंबर) कायम लक्षात राहणारा दिवस ठरला आहे. टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सविल येथे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला गेला. हा सामना झिम्बाब्वेने 3 विकेट्सने जिंकला. हा झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिलाच विजय ठरला आहे. हा सामना संपल्यानंतर चर्चा फक्त आणि फक्त झिम्बाब्वे संघाचीच होत आहे. मात्र असे होत असताना ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांने विक्रमांची रांग लावली आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) हा त्याचा 102वा वनडे सामना खेळत होता. झिम्बाब्वे विरुद्ध त्याने गोलंदाजी करताना रेयान बर्ल (Ryan Burl) याला बाद केले. त्याचा बाद करताच त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. ही त्याची 200वी विकेट ठरली. त्याचबरोबर त्याने सर्वात जलद 200 वनडे विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम करताना त्याने पाकिस्तानचा सक्लेन मुश्ताक यांचा 23 वर्षाचा विक्रम मोडला आहे. मुश्ताकने 1999मध्ये 104 वनडेमध्ये 200 विकेट्सचा आकडा पार केला होता.
वनडेमध्ये सर्वात जलद 200 विकेट्स घेणारे खेळाडू
सामने खेळाडू
102 – मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
104 – सक्लेन मुश्ताक (पाकिस्तान)
112 – ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया)
117 – ऍलन डोनाल्ड (दक्षिण आफ्रिका)
118 – वकार युनिस (पाकिस्तान)
या यादीतील पहिल्या 15 गोलंदाजांपैकी फक्त मिचेल स्टार्क आणि मिचेल जॉन्सन यांनी गेल्या वीस वर्षांत पदार्पण केले. त्याचबरोबर स्टार्कने या सामन्यात आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने सर्वात कमी चेंडूमध्ये 200 वनडे विकेट्सचा आकडा पार केला आहे. त्याने वनडेमध्ये 5276 चेंडूमध्ये 200 विकेट्स घेतले आहेत. हा पराक्रम करताना पुन्हा एकदा त्याने सक्लेन मुश्ताकला मागे टाकले आहे.
किमान चेंडूमध्ये सर्वात जलद 200 वनडे विकेट्स घेणारे खेळाडू
5276 मिचेल स्टार्क
5467 सक्लेन मुश्ताक
5688 ब्रेट ली
5886 वकार युनिस
6120 शोएब अख्तर
6198 ऍलन डोनाल्ड
6247 लसिथ मलिंगा
6280 मिचेल जॉन्सन
स्टार्कने बर्लला बाद करताना एक नाही दोन नाही तर तीन विक्रम केले आहेत. तो वनडेमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स, 150 विकेट्स आणि 200 विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे.
या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेने शेवटच्या सामन्याच विजय मिळवत इतिहास रचला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर वाद निवळला! दुखापतग्रस्त जड्डूसाठी सीएसकेने केले खास ट्विट
पाकिस्तानलाही जे जमलं नाही, ते झिम्बाब्वेने तीनच सामन्यात करून दाखवलं; ऑस्ट्रेलियाला मायदेशात हरवलं
विरुष्काचा फोटो वॉर्नरची कमेंट आणि ट्रोलिंग नंतरचं स्पष्टीकरण! वाचा काय आहे प्रकरण