शुक्रवारी (2 सप्टेंबर) पत्नी अनुष्का शर्माचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना विराट कोहलीने इमोजीच्या मदतीने तिच्याप्रतीचे प्रेम व्यक्त केले. कोहलीच्या या पोस्टला लोकांनी भरभरून प्रेम दिले असून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरनेही यावर कमेंट केली आहे. कोहलीच्या पोस्टवर काही लोकांनी वॉर्नरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आणि आता वॉर्नरला त्याच्या कमेंटबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.
कोहलीच्या पोस्टवर कमेंट करताना वॉर्नरने त्याला भाग्यवान म्हटले, ज्याचा लोकांचा गैरसमज झाला. यावर स्पष्टीकरण देताना वॉर्नरने लिहिले की, “आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला आधार देणार्या बायका आहेत. ऑस्ट्रेलियात असेच बोलले जाते. जसे मी असे म्हणू शकतो की कॅंडिस मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. जेव्हा आपण दुसऱ्याला असे म्हणतो तेव्हा आपण त्याला सांगतो की मित्रा तू खूप भाग्यवान आहेस. हे समजून घेणे नेहमीच वेगळे असू शकते.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
VIDEO | दम वाढवण्यासाठी विराटची ट्रीक, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी खास मास्क घालून केला सराव
यूएस ओपनच्या तिसऱ्या राउंडमध्येच थांबला टेनिस क्वीन सेरेना विलियम्सचा प्रवास
आता श्रीलंका अफगाणिस्तानची जिरवणार! पराभवाचा वचपा काढण्यासाठी ‘ही’ तगडी इलेव्हन उतरवणार