ख्राईस्टचर्च। न्यूझीलंडमध्ये नुकतीच महिला विश्वचषक २०२२ स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. या दोन संघात रविवारी (३ एप्रिल) हॅगली ओव्हल स्टेडियमवर अंतिम सामना पार पडला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हेलीने दमदार कामगिरी करताना दीडशतकी खेळी केली. यावेळी हा सामना पाहाण्यासाठी एलिसा हेली हिचा पती आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क देखील उपस्थित होता.
या सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन महिला संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी इंग्लंडचा हा निर्णय प्राथमिकत: चूकीचा सिद्ध केला. ऑस्ट्रेलियाकडून सलामीला खेळायला आलेल्या एलिसा हेली आणि रेचल हाईन्स यांनी तब्बल दीडशतकी भागीदारी रचली. हाईन्स ६८ धावा करून बाद झाली. पण, हेलीने आक्रमक खेळ चालू ठेवला आणि शतकाला गवसणी घातली.
तिने ३५ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अन्या श्रबसोलविरुद्ध एकेरी धाव काढत शतक पूर्ण केले. हे शतक तिने पूर्ण करताच स्टँडमध्ये बसलेला स्टार्कला खूश झालेला दिसला. तसेच तो आनंदाने उभा राहून टाळ्याही वाजवाताना दिसला. त्याचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला आयसीसीने कॅप्शन दिले आहे की, ‘महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आपल्या पत्नीला प्रोत्साहन देणे, हाच आनंद आहे.’ (Mitchell Starc Cheers For Wife Alyssa Healy for Cetunry in Women’s World Cup Final)
https://www.instagram.com/p/Cb390xPodsp/
हेलीचे विक्रमी शतक
हेलीचे अंतिम सामन्यात केलेले महिला विश्वचषक २०२२ मधील दुसरे शतक ठरले आहे. यापूर्वी तिने उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध १२९ धावांची खेळी केली होती. तसेच ती आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात १५० पेक्षा अधिक धावा करणारी पहिलीच क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी असा पराक्रम कोणालाही करता आलेला नाही.
हेलीने या सामन्यात तब्बल २६ चौकारांसह १३८ चेंडूत १७० धावांची खेळी केली. तिच्या आणि हाईन्स व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाकडून बेथ मूनीनेही अर्धशतकी खेळी केली. तिने ६२ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ५ बाद ३५६ धावा केल्या. तसेच इंग्लंडसमोर विजयासाठी ३५७ धावांचे आव्हान ठेवले.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL2022| चेन्नई वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!