आयपीएल २०२२ च्या ११ व्या सामन्यात चार वेळा आयपीएल ट्रॉफी विजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमने सामने असतील. हा सामना रविवारी म्हणजेच ३ एप्रिल रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. सामना रात्री ७ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल. चला तर जाणून घेऊया या सामन्यात तुम्ही कोणत्या ११ खेळाडूंसह स्वतःचा फँटसी इलेव्हन संघ बनवू शकता.
चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल २०२२ ची सुरूवात खूपच निराशाजन राहिली आहे. सीएसकेने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच हंगामातील पहिले दोन सामने गमावले आहेत. अशात पंजाब किंग्जला पराभूत करून सीएसके त्यांचा पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे पंजाब किंग्जचा विचार केला, तर त्यांनी पहिल्या दोन सामन्यांपैकी एकात विजय आणि एकात पराभव पत्करला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यासाठी संभावित प्लेइंग इलेव्हन –
चेन्नई सुपर किंग्जची संभावित प्लेइंग इलेवन- ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोइन अली, अंबाती रायडू, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा (कर्णधार), शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, ड्वेन प्रिटोरियस, ख्रिस जॉर्डन, राजवर्धन हंगरगेकर.
पंजाब किंग्जची संभावित प्लेइंग इलेवन- मयंक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, भानुका राजपक्षे (यष्टीरक्षक), ओडियन स्मिथ, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंग, राहुल चाहर.
असा बनवू शकता स्वतःचा ड्रीम ११ संघ
यष्टीरक्षक – एमएस धोनी, भानुका राजपक्षे
फलंदाज – शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा
अष्टपैलू – मोईन अली, रवींद्र जडेजा, लियाम लिविंगस्टोन
गोलंदाज – ड्वेन ब्रावो, राहुल चाहर, कगिसो रबाडा
कोणाला बनवू शकता कर्णधार आणि उपकर्णधार
कर्णधाराच्या रूपात सीएसकेचा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) एक चांगला पर्याय ठरू शकतो. मागच्या वर्षी ऑरेंज कॅप विजेता ऋतुराज लखनऊविरुद्धच्या मागच्या सामन्यात दुर्दैवाने धावबाद झाला होता. परंतु, पंजाब किंग्जविरुद्धच्या या सामन्यात चमकदार खेळी दाखवू शकतो.
उपकर्णधाराच्या रूपात पंजाब किंग्जचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) चांगले गुण मिळवून देऊ शकतो. धवनने आयपीएलमध्ये सीएसकेविरुद्ध खेळलेल्या २६ सामन्यांमध्ये तब्बल ९०८ धावा केल्या आहेत. या धावा त्याने ४१.२७ च्या सरासरीने केल्या आहेत. सीएसकेविरुद्ध डावाची सुरुवात करताना तो मोठी खेळी करू शकतो.






