प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऍशेस कसोटी मालिकेतील दुसरा सामना लंडन येथे लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा पाहुणे ऑस्ट्रेलिया संघाने सामन्यावरील आपली पकड मजबूत केली होती. इंग्लंडला विजयासाठी दिलेल्या 371 धावांचा बचाव करताना ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचे चार फलंदाज 114 धावांवर बाद झाले आहेत. अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयाची चांगली संधी आहे. असे असतानाच सामन्याच्या चौथ्या दिवशी एक वादग्रस्त घटना घडली.
दिवसाचा खेळ संपण्यासाठी अवघी दोन षटके बाकी असताना, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन हा गोलंदाजी करत होता. त्याच्या चेंडूवर फलंदाज बेन डकेट याने एक विचित्र फटका मारला. त्यावेळी फाईन लेगला उभ्या असलेल्या मिचेल स्टार्क याने सुर मारत झेल पूर्ण केला. प्रथमदर्शनी पंचांनी तो झेल योग्यपणे टिपला असे जाहीर करत फलंदाजाला बाद दिले. मात्र, डकेटने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितल्यानंतर तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद ठरवले.
Well then…
What do we think of this one? 👀
Cleary grounded 😉 #EnglandCricket | #Ashes pic.twitter.com/bPHQbw81dl
— England Cricket (@englandcricket) July 1, 2023
रिप्लेमध्ये स्टार्कने तो झेल योग्यरीत्या पूर्ण केल्याचे दिसत आहे. मात्र, त्यानंतर उभे राहताना चेंडू जमिनीला लागल्याचे दिसून येते. असे असले तरी, हा झेल योग्य होता असे मत अनेकांनी व्यक्त केले. त्यामुळे आता नवीनच वाद निर्माण झालेला दिसून येतो.
काही दिवसांपूर्वीच संपन्न झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील भारताच्या शुबमन गिल याचा असाच एक वादग्रस्त झेल ग्रीन याने पकडलेला. त्यानंतर याच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ याने टिपलेला एक झेल असाच संशयास्पद होता. या सर्व प्रकरणांमुळे आता आयसीसीवर टीका होतेय.
(Mitchell Starc Controversial Catch Of Ben Duckett In Lords Test)
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा फ्रॉड! आपल्याच खेळाडूंचे 25-25 लाख लाटले, वाचा सविस्तर
वेस्ट इंडीज क्रिकेटला लागली घरघर! 7 वर्षात आयसीसी ट्रॉफीची मुख्य फेरी गाठणेही झाले दुरापस्त