---Advertisement---

IPL । 2015 नंतर सात आयपीएल हंगाम नाही खेळला मिचेल स्टार्क गोलंदाज, आता स्वतःच सांगितले कारण

Mitchell Starc
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज मिचेल स्टार्क गोलंदाजी करताना दिसणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकात कोलकाता नाईट रायडर्स संघाने स्टार्कला मोठी बोली लावून खरेदी केले. यावर्षी महागात विकला गेलेला स्टार्क मागच्या सात आयपीएल हंगामांमध्ये मात्र खेळला नव्हता. त्याने यामागचे कारण नुकतेच स्पष्ट केले.

ऑस्ट्रेलियन संघाचा हा वेगवान गोलंदाज नेहमीच वेगवेगळ्या टी-20 लीगपेक्षा देशाला अधिक महत्व देताना दिसला आहे. इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) शेवटचा हंगामा स्टार्कने 2015 मध्ये खेळला होता. त्यावेळ वेगवान गोलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघाकडून खेळत होता. पण मागच्या सात आयपीएल हंगामांमध्ये त्याने स्वतःच्या मर्जीने भाग घेतला नाही, असे स्टार्कने स्पष्ट केले. तसेच याविषयी कुठलाच पश्चाताप देखील त्याला वाटत नाहीये.

मिचेल स्टार्क म्हणाला, “आयपीएल न खेळण्याचा निर्णय माझा स्वतःचा होता. एवढी वर्ष आयपीएल न खेळल्यामुळे कुठलाच पश्चाताप होत नाहीये. आयपीएल न खेळल्यामुळेच माझी कसोटी कारकीर्द चांगली झाली, असे मला वाटते. त्यामुळे मी घेतलेल्या निर्णयाचा आनंदच आहे.” आयपीएल लिलिवात स्टार्कला खरेदी करण्यासाठी लढाओढ पाहायला मिळाली. परिणामी आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून त्याच्या नावावर विक्रम नोंदवला गेला. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला खरेदी करण्यासाठी 24.75 कोटी रुपये खर्च केले. आयपीएल फ्रँचायझींनी त्याला खरेदी करण्यासाठी केलेले प्रयत्न पाहून स्वतः स्टार्क देखील आनंदी असल्याचे यावेळी दिसले. त्याने सर्व फ्रँचायजींचे आभार मानले.

स्टार्क नुकताच ऑस्ट्रेलियाला वनडे विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघाचा भाग राहिला आहे. 2023 वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताला मात दिली आणि इतिहासातील सहावा वनडे विश्वचषक जिंकला. या विजयात स्टार्कचे योगदान देखील महत्वाचे राहिले. (Mitchell Starc explains why he didn’t play in the last seven IPL seasons)

महत्वाच्या बातम्या – 
याला क्रिकेट ऐसे नाव! विजेत्या टीम इंडियाचा ॲास्ट्रेलियाच्या कर्णधारानेच काढला फोटो, मन जिंकणारा Video पाहाच
‘कोहलीला कसोटीमध्ये आऊट करायचा फॉर्म्युला सापडला, तुम्ही फक्त…’, दिग्गज क्रिकेटरने दिली आयडिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---