ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात यजमान संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं ऑस्ट्रेलियन भूमीवर सर्वात जलद 100 बळी घेण्याचा मोठा विक्रम केला.
मिचेल स्टार्कनं या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट ली याला मागे टाकलं. ब्रेट लीनं आपल्या कारकिर्दीतील 55व्या डावात ही कामगिरी केली होती. तर स्टार्कनं हा विक्रम करण्यासाठी त्याच्यापेक्षा एक डाव कमी घेतला. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्टार्कनं 10 षटकांत 33 धावा दिल्या आणि तीन विकेट घेतल्या.
मिचेल स्टार्कनं आपल्या स्पेलमध्ये शाहीन आफ्रिदीसह अब्दुल्ला शफीक आणि सैम अयुबची विकेट घेतली. ब्रेट ली, ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, क्रेग मॅकडरमॉट आणि स्टीव्ह वॉ यांच्यानंतर ऑस्ट्रेलियन भूमीवर 100 वनडे विकेट घेणारा तो सहावा गोलंदाज ठरला आहे.
ऑस्ट्रेलियात सर्वात कमी डावात 100 एकदिवसीय विकेट घेणारे गोलंदाज
मिचेल स्टार्क- 54 डाव
ब्रेट ली – 55 डाव
ग्लेन मॅकग्रा – 56 डाव
शेन वॉर्न – 61 डाव
क्रेग मॅकडरमॉट – 71 डाव
स्टीव्ह वॉ – 93 डाव
मिचेल स्टार्कचा 26.1 चेंडू प्रति विकेटचा स्ट्राइक रेट या सहा खेळाडूंमध्ये सर्वोत्तम आहे. तर ऑस्ट्रेलियात किमान 50 एकदिवसीय विकेट्स असलेल्या खेळाडूंमध्ये क्लिंट मॅके (24.7) नंतर दुसरा सर्वोत्तम आहे.
घरच्या मैदानावर सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत मिचेल स्टार्कनं स्टीव्ह वॉला मागं टाकलं. वॉनं आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियात 101 विकेट घेतल्या होत्या. तर स्टार्कच्या नावावर आता 102 विकेट्स झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम ब्रेट लीच्या नावावर आहे, ज्यानं आपल्या कारकिर्दीत 169 एकूण विकेट्स घेतल्या.
हेही वाचा –
कोच गौतम गंभीरवरील दबाव वाढला, बॉर्डर-गावस्कर मालिका ‘करो या मरो’!
सोप्पं नाही भाऊ! केविन पीटरसनने टीम इंडियाला असं केलं ट्रोल
रोहित शर्मा फलंदाजीत फ्लॉप का होतोय? माजी खेळाडूनं कारण सांगितलं, म्हणाला…