ऑस्ट्रेलियन संघातील डाव्या हाताचा जलद गोलंदाज मिचेल स्टार्क याच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. मंगळवारी (२३ फेब्रुवारी) त्याचे वडिल पॉल यांचे निधन झाले आहे. यामुळे स्टार्कने शेफील्ड शील्ड स्पर्धेतून माघार घेतली आहे.
स्टार्कला चांगला फॉर्म गवसाताना दिसत नाहीये. २०२०-२१ मध्ये भारतीय संघाविरुद्ध झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. या मालिकेत त्याने अवघे ११ गडी बाद केले होते. तसेच आयपीएल लिलावापुर्वी स्टार्क लिलावात सहभागी होत असल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. परंतु त्यानंतर त्याने आपले नाव लिलावातून मागे घेतले. अशातच वडिलांच्या निधनामुळे त्याला शेफील्ड शील्ड स्पर्धेतून देखील माघार घ्यावी लागली आहे.
पॉल यांना कँसर हा आजार झाला होता. खूप काळ अस्वस्थ राहिल्यानंतर अखेर मंगळवारी दुःखद बातमी आली. मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डाव्या हाताच्या या जलद गोलंदाजाने गेल्या आठवड्यातच शेफील्ड शील्ड या स्पर्धेत पुनरागमन केले होते. सिडनी मैदानावर खेळल्या गेलेल्या त्या ४ दिवसीय सामन्यात दोन्ही डावात मिळून त्याला एकच गडी बाद करण्यात यश आले. परंतु ही घटना घडल्यानंतर त्याने काही वेळ कुटुंबासोबत घालवण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. याचबरोबर त्याची पत्नी एलीसा हेली देखील एनएसडबल्यू वुमेन्स नॅशनल क्रिकेट लीग या स्पर्धेतून माघार घेणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“पुजाराने द्विशतक झळकावत टीम इंडियाला तिसरी कसोटी जिंकून द्यावी,” गृहमंत्रींनी व्यक्त केली इच्छा
आयपीएल २०२१ पुर्वी देवदत्त पड्डीकलची वादळी खेळी, १४ चौकारांसह चोपल्या तब्बल १५२ धावा