जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021-23चा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन बलाढ्य संघ या सामन्यात आमने सामने आहेत. पहिल्या डावानंतर ऑस्ट्रेलियन संघ 173 धावांनी आघाडीवर होता. ओव्हलच्या ग्रीन टॉप खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारतीय गोलंदाजांना कमी प्रमाणात फायदा मिळत आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने पहिल्या डावातील प्रदर्शनाच्या जोरावर मोठा विक्रम नावावर केला.
डब्ल्यूटीसीच्या या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 469 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 296 धावांपर्यंत मजल मारली. मिचेल स्टार्क (Mitchell Starc) ऑस्ट्रेलियन संघाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. शुक्रवारी (9 जून) स्टार्कने आपल्या 600 आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण केल्या. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात स्टार्कने एकूण 2 विकेट्स घेतल्या. विराट कोहली (Virat Kohli) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) यांना त्याने या डावात बाद केले.
मिचेल स्टार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 विकेट्सचा टप्पा पार करणारा ऑस्ट्रेलियाचा केवळ तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी ग्लेन मॅकग्रा आणि ब्रेट ली यांनी केली आहे. एकंदरीत विचार केला, तर ऑस्ट्रेलियासाठी 600 विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे.
ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारे गोलंदाज
शेन वॉर्न- 1001
ग्लेन मैक्ग्रा- 949
ब्रैट ली- 718
मिचेल स्टार्क- 600
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांचा विचार केला, तर श्रीलंकेचा माजी दिग्गज मुथय्या मुरलीधरन याचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. मुरलीधरनने आपल्या कारकिर्दीत एकूण 1347 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या. यादीत दुसरा क्रमांका ऑस्ट्रेलियाचा दिवंगत दिग्गज शेन वॉर्न आहे. वॉर्नने आपल्या कारकिर्दीत एकूण 1001 विकेट्स घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर जेम्स अँडरसन आहे, ज्याने 972 विकेट्स घेतल्या आहेत. यादीत चौथा क्रमांक अनिल कुंबळे, तर पाचवा क्रमांक ग्लेन मॅकग्रा यांचा आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारे गोलंदाज
मुथैया मुरलीधरन- 1347
शेन वॉर्न- 1001
जेम्स एंडरसन- 972
अनिल कुंबले- 956
ग्लेन मैक्ग्रा- 949
वसीम अकरम- 916
(Mitchell Starc has become the third Australian to take 600 wickets)
महत्वाच्या बातम्या-
मागच्या 10 वर्षांपासून टीम इंडिया का जिंकत नाहीये आयसीसी ट्रॉफी? हरभजन सिंगने स्पष्टच सांगितलं
‘मी स्वतः पाहिलंय, बृजभूषण प्रत्येक दौऱ्यात 2-3 महिला खेळाडूंसोबत…’, आंतरराष्ट्रीय पंचाचा गंभीर खुलासा, वातावरण तापलं!