---Advertisement---

कदरदान स्टार्क! युवा महिला वेगवान गोलंदाजाला केली ‘मौल्यवान’ मदत

On: रविवार, ऑक्टोबर 3, 2021 10:48 PM
Mitchell-Starc
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आपल्या भेदक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आपल्या वेगाने व अचूक यॉर्करने तो जगभरातील सर्व फलंदाजांना अडचणीत आणण्यात माहीर आहे. यासोबतच, स्टार्क महिला क्रिकेटला देखील वारंवार पाठिंबा देताना दिसतो. ऑस्ट्रेलिया महिला आणि भारत महिला यांच्यात मॅट्रिकॉन स्टेडियम येथे झालेल्या एकमेव कसोटीच्या पहिल्या दिवशी स्टार्कचे आणखी एक रूप सर्वांना पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार व प्रसिद्ध समालोचक लीसा स्थळेकर हिने याबाबत खुलासा केला आहे.

कदरदान स्टार्क
लीसा स्थळेकर हिने एका वृत्तवाहिनीशी बोलताना ऑस्ट्रेलिया महिला व भारत महिला यांच्यातील कसोटीच्या पहिल्या दिवशीचा एक किस्सा सर्वांना सांगितला. यामध्ये तिने मिचेल स्टार्कबाबत बोलताना म्हटले,
“या सामन्यातून ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण करणारी स्टेला कॅम्पबेल गोलंदाजी करत असताना तिने क्रिजवर थोडा भुसा टाकण्यास सांगितले. वेगवान गोलंदाजी करताना मदत व्हावी म्हणून तिने असे केले होते. गोलंदाजी संपल्यानंतर स्टार्क तिथे गेला आणि तिला विचारले, तुझ्याकडे लांब स्पाईक असलेले शूज आहेत का? त्यावर तिने नकारार्थी उत्तर दिल्यानंतर स्टार्क तडक बाहेर गेला व सर्व वेगवान गोलंदाजांसाठी लांब स्पाईक असलेले शूज घेऊन आला. परिस्थितीनुरूप, गोलंदाजी शूज असावे यासाठी हे शूज दिल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले होते.”
मिचेल स्टार्क याची पत्नी एलिसा हिली ही ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची प्रमुख सदस्या आहे. स्टार्क सातत्याने ऑस्ट्रेलिया महिला संघाला पाठिंबा देण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उपस्थित राहतो.

स्टार्कच्या हातून मिळाली टेस्ट कॅप
वेगवान गोलंदाज असलेल्या स्टेला हिला तिची बॅगी ग्रीन (टेस्ट कॅप) याच्या हातून देण्यात आली होती. तिने ऑस्ट्रेलियासाठी खेळाचे आपले स्वप्न पूर्ण झाल्याची भावना यानंतर व्यक्त केलेली. स्टेला हिने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गोलंदाजी करताना नव्या शूजसह दोन महत्वपूर्ण बळी मिळवले होते. उभय संघातील हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला. पहिल्या डावात शतक झळकावणारी स्मृती मंधाना सामनावीर ठरली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---