वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं सध्या ऑस्ट्रेलियन कॅम्पमधील तणाव वाढवला आहे. मेलबर्न कसोटीच्या तिसऱ्या दिवशी गोलंदाजी करताना स्टार्क वेदनेत दिसत होता. मात्र तरीही त्यानं गोलंदाजी सुरूच ठेवली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्कॉट बोलँडनं स्टार्कच्या दुखापतीबाबत अपडेट दिलं आहे. स्टार्क बरा असल्याचं बोलंडचं मत आहे. मेलबर्न कसोटीच्या तिसऱ्या दिवसापर्यंत स्टार्कला अद्याप एकही बळी घेता आलेला नाही.
मेलबर्नमध्ये खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गोलंदाजी करताना मिचेल स्टार्क पाठीला धरून बसलेला दिसला. त्यानंतर टीम फिजिओथेरपिस्ट निक जोन्स यांनी त्याच्यावर उपचार केले. आता स्टार्क अधिक चांगला दिसत असून तो चांगल्या गतीनं गोलंदाजी करत असल्याचं बोलंडने सांगितलं. या सामन्यात स्कॉट बोलंडनं 27 षटकांत 57 धावा देऊन 3 बळी घेतले आहेत.
स्कॉट बोलंड म्हणाला, “तो ठीक आहे. त्याच्या पाठीत कुठेतरी थोडासा त्रास आहे. मला माहित नाही, कदाचित पाठीच्या मागे कुठेतरी. पण ब्रेकनंतर जेव्हा तो परत आला तेव्हा तो 140 किमी/तास वेगानं गोलंदाजी करत होता. त्यामुळे तो ठीक असल्याचा माझा अंदाज आहे.”
बोलंड पुढे म्हणाला, “मला वाटतं की तो जितका मजबूत आहे, त्यापेक्षा त्याला कमी लेखलं जातं. काही वर्षांपूर्वी येथे एमसीजीमध्ये त्याचं बोट मोडलं होतं आणि आम्ही त्याला अजिबात गोलंदाजी न देण्याचा विचार करत होतो. परंतु तो आला आणि त्यानं 140 किमी/तास वेगानं चेंडू टाकला.”
“तो एक गोलंदाज आहे जो वेदना सहन करू शकतो. त्यानं आतापर्यंत सुमारे 90 कसोटी सामने खेळले आहेत. एक वेगवान गोलंदाज म्हणून असे खूप कमी सामने आहेत जिथे तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय खेळता. तो एक असा खेळाडू आहे जो त्याला वेदना होत असताना देखील त्याच गतीनं गोलंदाजी करू शकतो”, असं बोलंडनं सांगितलं.
हेही वाचा –
नितीश रेड्डीच्या शतकामागे सिराजची भूमिका महत्त्वाची, 99 धावांवर असताना केला चमत्कार
मूर्खपणा, मूर्खपणा, मूर्खपणा!….या भारतीय खेळाडूवर भडकले सुनील गावस्कर; ड्रेसिंग रुममधून बाहेर करण्याची मागणी
ऑस्ट्रेलियात कसोटी शतक झळकावणारे सर्वात तरुण भारतीय, दिग्गजांच्या लिस्टमध्ये नितीश रेड्डीचाही समावेश