ऑस्ट्रेलियन ‘स्पीड स्टार’ मिचेल स्टार्क आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. स्टार्कचा जन्म 30 जानेवारी 1990 रोजी ऑस्ट्रेलियामधील न्यू साउथ वेल्स या शहरात झाला होता. लहान वयापासूनच स्टार्कमध्ये प्रचंड आत्मविश्वास होता. या आत्मविश्वासाच्या बळावरच त्याने हळूहळू यशाते शिखर गाठण्यास सुरुवात केली. स्टार्कची विशेषता म्हणजे, दबावाच्या क्षणी तो आणखीनच उत्तम कामगिरी करतो. अशा या ‘यॉर्कर किंग’बद्दलच्या 5 महत्त्वाच्या बाबी आपण या लेखात बघणार आहोत.
- स्टार्कने आपल्या क्रिकेटची सुरुवात एक यष्टीरक्षक खेळाडू म्हणून केली होती. स्टार्क लहानपणापासूनच ऑस्ट्रेलियन दिग्गज ॲडम गिलख्रिस्टचा फार मोठा चाहता होता. मात्र काही वर्षांनंतर प्रशिक्षकांच्या सांगण्यावरून त्याने वेगवान गोलंदाजीकडे आपला मोर्चा वळवला व पुढे जे काही घडले तो इतिहास आहे.
- नवव्या क्रमांकावर फलंदाजासाठी येऊन 99 धावांवर बाद होणारा स्टार्क हा जगातील एकमेव खेळाडू आहे. 2013 साली मोहाली येथे भारताविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात स्टार्क नवव्या स्थानावर फलंदाजीला येणारा नर्वस नाइंटिजचा पहिला शिकार बनला होता.
- स्टार्कने 2015 साली संपूर्ण क्रिकेटविश्वाला आपल्या वेगवान गोलंदाजीची झलक दाखवली. न्यूझीलंड विरुद्ध खेळताना त्याने 160.04 च्या गतीने चेंडू टाकला होता. हा कसोटी इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू ठरला होता.
- स्टार्कने ऑस्ट्रेलियन महिला संघाची यष्टिरक्षक खेळाडू एलीसा हीलीसोबत विवाह केलेला आहे. स्टार्क अनेकवेळा पत्नीला प्रोत्साहन देण्यासाठी महिला क्रिकेटचे सामने बघण्यासाठी स्टेडियममध्ये जात असतो.
– स्टार्कची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
स्टार्कने 20 ऑक्टोबर 2010 रोजी वनडे व 1 डिसेंबर 2011 रोजी आपले कसोटी पदार्पण केले होते. स्टार्कने आतापर्यंत 99 वनडे सामन्यात 22.46 च्या सरासरीने 195 बळी घेतलेले आहेत. 28 धावा देत 6 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिलेली आहे. कसोटी क्रिकेट मध्ये स्टार्कने 66 सामने खेळलेले असून त्यात 274 बळी मिळवले आहेत. 50 धावा देत 6 बळी ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी राहिलेली आहे. स्टार्कने 48 टी 20 सामने देखील खेळलेले असून त्यात 60 बळी मिळवले आहेत. स्टार्क गोलंदाजाची सोबतच तळाला येऊन आक्रमक फटके मारण्यासाठी देखील क्रिकेटविश्वात प्रसिद्ध आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हरियाणा हरिकेन’ कपिल देव यांनी आजच्याच दिवशी केला होता कसोटीतील ‘मोठा’ विश्वविक्रम
आयपीएल मेगा लिलावात ‘या’ दमदार खेळाडूंना मिळणार नाही भाव; जाणून घ्या कारण
हेही पाहा-