ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा मोठ्या सामन्यांमध्ये त्याच्या दमदार कामगिरीसाठी ओळखला जातो. याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. त्यानं क्वालिफायर 1 सामन्यात पॉवर प्लेमध्ये 3 बळी घेऊन हैदराबादचं कंबरडंच मोडलं.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सध्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात क्वालिफायर 1 चा सामना खेळला जात आहे. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या हैदराबादची सुरुवात खूपच खराब झाली. स्टार्कनं आक्रमक सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर तंबूत पाठवलं. हेड भोपळाही फोडू शकला नाही.
Starc sets the tone for Qualifier 1 with a ripper! 🔥#IPLonJioCinema #TATAIPL #KKRvSRH #TATAIPLPlayoffs #IPLinBengali pic.twitter.com/3AJG5BvZwT
— JioCinema (@JioCinema) May 21, 2024
यानंतर आपल्या पुढच्या ओव्हरमध्ये स्टार्कनं फार्मात असलेल्या नितीश रेड्डीला बाद केलं. आंद्रे रसलनं त्याचा शानदार झेल घेतला. रेड्डीनं 10 चेंडूत 9 धावा केल्या. स्टार्कनं पुढच्याच चेंडूवर शाहबाज अहमदला बोल्ड केलं. तो पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. मिचेल स्टार्कच्या आग ओकणाऱ्या चेंडूचं हैदराबादच्या फलंदाजांकडे काहीच उत्तर नव्हतं. स्टार्कनं पॉवर प्लेमध्ये 3 षटकं गोलंदाजी करून 3 विकेट घेतल्या. त्यानं या दरम्यान 7.3 च्या इकॉनॉमी रेटनं फक्त 22 धावा दिल्या.
Not a good day to be a Stump 🥲#IPLonJioCinema #TATAIPL #KKRvSRH #TATAIPLPlayoffs #MitchellStarc pic.twitter.com/9XoxrrdzMs
— JioCinema (@JioCinema) May 21, 2024
आयपीएलच्या या हंगामात मिचेल स्टार्कची कामगिरी संमिश्र राहिली आहे. केकेआरनं त्याला मिनी लिलावात तब्बल 24.75 कोटी रुपये देऊन करारबद्ध केलं होतं. अशाप्रकारे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला. मात्र सुरुवातीच्या सामन्यांमध्ये स्टार्कची खूप पिटाई झाली. ज्यानंतर त्याला खूप टीकेचा सामना करावा लागला. मात्र आता प्लेऑफमध्ये स्टार्कनं आपल्या गोलंदाजीनं सर्व टीकाकारांची बोलती बंद केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल 2025 च्या लिलावापूर्वी चेन्नई ‘या’ 4 खेळाडूंना रिटेन करू शकते, धोनीचं काय होणार?