वनडे विश्वचषक समाप्तीनंतर सध्या आयपीएल 2024 ची चर्चा सुरू आहे. सध्या आयपीएलची ट्रेडिंग विंडो सुरू असून, 26 नोव्हेंबर रोजी हा कालावधी संपन्न होत आहे. त्यानंतर संघ आपण कायम ठेवलेल्या आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करतील. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दुबई येथे आयपीएल 2024 साठी खेळाडूंचा लिलाव पार या लिलावासाठी आता नुकत्याच झालेल्या विश्वचषकात दमदार कामगिरी केलेल्या खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे.
एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास 600 खेळाडू हे या लिलावात उतरताना दिसतील. विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघातील अनेक मातब्बर खेळाडूंनी यावेळी लिलावात उतरण्यासाठी होकार दर्शवला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पेट कमिन्स मागील वर्षीच्या विश्रांतीनंतर यावर्षी पुन्हा एकदा आयपीएल लिलावात दिसेल. तर, मिचेल स्टार्क पाच वर्षानंतर लिलावात सहभागी होणार आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा नायक ठरलेला ट्रेविस हेड हा देखील 2017 नंतर प्रथमच आयपीएल खेळताना दिसू शकतो. त्याने लिलावासाठी आपली उपलब्धता कळवली आहे. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक जोस इंग्लिस हा देखील आयपीएल खेळण्यास उत्सुक आहे
विश्वचषकात आपल्या शानदार कामगिरीने सर्वांची मने जिंकणारे युवा खेळाडू न्यूझीलंडचा रचिन रवींद्र, नेदरलँड्सचा बास डी लिडे व दक्षिण आफ्रिकेचा गेराल्ड कोएत्झे हे देखील लिलावासाठी उपलब्ध आहेत. याबरोबरच न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज डेरिल मिचेल, फिरकीपटू केशव महाराज व इंग्लंडचा गस ऍटकिन्सन हेदेखील लिलावात आपले नशीब आजमावतील.
आयपीएल 2024 यावेळी मार्च महिन्याच्या मध्यात सुरू होऊ शकते. जून महिन्यात टी20 विश्वचषक खेळला जाणार असल्याने, आयोजक हा निर्णय घेऊ शकतात.
(Mitchell Starc, Rachin, Cummins, Daryl Mitchell and Head will be available at the IPL 2024 auction for purchase)
हेही वाचा-
“मला माही भाईने सांगितले होते…”, नवा फिनिशर रिंकूने दिले धोनीला क्रेडिट
World Cup Final मध्ये ऑस्ट्रेलियाने केलेल्या हुशारीचा अश्विनकडून खुलासा, म्हणाला, “त्यांनी आयपीएल…”