बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. पाचव्या दिवशी सामन्याचा थरार अगदी शिखरावर पोहचलाय. ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 340 धावांचं लक्ष्य दिलं. सध्या दोन्ही संघ जिंकण्यासाठी मैदानावर घाम गाळत आहेत. दरम्यान, मिशेल स्टार्क आणि यशस्वी जयस्वाल यांच्यात एक मजेशीर प्रसंग घडला, ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते आहे.
झालं असं की, मिचेल स्टार्क रिषभ पंतला बॉल टाकण्यासाठी रनअप घ्यायला जात होता. जाता-जाता त्यानं नॉन स्ट्रायकर एंडवर असलेल्या स्टम्पच्या बेल्स उचलल्या आणि त्यांची जागा बदलून पुन्हा ठेवल्या. यानंतर यशस्वी जयस्वालनं जे केलं, ते पाहण्यासारखं होतं. जयस्वाल त्यावेळी नॉन स्ट्रायकर एंडवर उभा होता. तो लगेच स्टम्प जवळ पोहचला आणि त्यानं बेल्स पुन्हा आधी होत्या तशाच ठेवल्या.
यशस्वी जयस्वालनं असं केल्यानंतर मिचेल स्टार्क आणि त्याच्यात संभाषण झालं. स्टार्क त्याला म्हणाला, ‘”तू अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतो का?” यावर उत्तर देताना जयस्वाल म्हणाला, “मी केवळ माझ्यावर विश्वास ठेवतो.” येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, यशस्वी जयस्वाल आणि मिचेल स्टार्क यांच्यात पहिल्या कसोटीपासून शीतयुद्ध सुरू आहे. तुम्ही या घटनेचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
The bail-switching antics are back! This time between Mitchell Starc and Yashasvi Jaiswal 👀#AUSvIND pic.twitter.com/oK8xkSd4qI
— cricket.com.au (@cricketcomau) December 30, 2024
यंदाच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये दोन्ही संघात प्रचंड स्पर्धा पाहायला मिळत आहे. तीन कसोटीनंतर मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. भारतीय संघानं पर्थमधील पहिली कसोटी जिंकली होती. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं कमबॅक करत टीम इंडियाला धूळ चारली. ब्रिस्बेनमधील तिसरी कसोटी ड्रॉ राहिली. आता मेलबर्नमधील चौथ्या कसोटीत पाचव्या दिवसाचा खेळ सुरू आहे. आज तिन्ही निकाल शक्य आहे. म्हणजेच भारत किंवा ऑस्ट्रेलिया, दोन्ही संघ हा सामना जिंकू शकतात किंवा सामना ड्रॉ देखील होऊ शकतो.
हेही वाचा –
विराट कोहलीच्या निवृत्तीची वेळ जवळ आलीय? पाहा आकडेवारी काय सांगते
मेलबर्न कसोटीत फक्त बुमराहचीच हवा! या कामगिरीसह दिग्गजांच्या लिस्टमध्ये एंट्री
“भाऊ, तु आता निवृत्ती घे”; रोहित शर्मा पुन्हा फ्लॉप, सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सुरुवात