ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान झालेल्या दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजला 2-0 असे पराभूत केले. ब्रिस्बेन येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 31 धावांनी विजय साजरा केला. याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने वेस्ट इंडिजचा सलामीवीर कायले मायर्सचा टिपलेला झेल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
मायर्स हा पहिला सामन्यात मारलेल्या त्याच्या षटकारामुळे चर्चेत आला होता. त्याच्या या षटकाराचे अनेक दिग्गजांनी कौतुक केलेले. अनेकांनी त्याला आजवरच्या इतिहासातील सर्वोत्तम षटकार असे देखील म्हटलेले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्याच्याकडून अशाच खेळाची अपेक्षा सर्वांना होती. मात्र, स्टार्कने आपल्याच गोलंदाजीवर त्याचा असा काही झेल घेतला की, सर्वजण स्टार्कचे कौतुक करू लागले आहेत.
HOW?!
Starc scoops up a classic caught and bowled to send Mayers packing! #AUSvWI pic.twitter.com/xMUT394zob
— cricket.com.au (@cricketcomau) October 7, 2022
ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 179 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाला पहिल्याच षटकात मायर्सच्या रूपाने मिचेल स्टार्कने पहिला धक्का दिला. मायर्सने लो फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने फटकावला. मात्र, तो चेंडू थेट स्टार्कच्या हातात गेला. 6 फूट 6 इंच उंची असलेल्या स्टार्कने वाकत एक अप्रतिम झेल घेतला. या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरचे (75) अर्धशतक आणि टीम डेव्हिडच्या 42 धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर 179 धावांचे लक्ष्य ठेवले. याचा पाठलाग करताना पाहून संघ गडबडला. स्टार्कने चार बळी मिळवत वेस्ट इंडीजच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. निर्धारित 20 षटकात वेस्ट इंडीज संघ 147 धावा करण्यात यशस्वी ठरला. डेव्हिड वाढणाऱ्याला मालिकेचा मानकरी घोषित करण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिहारच्या सौरभ कुमारने 49 रुपयांचे केले 1 कोटी, हार्दिक पंड्याला संघात घेतल्यामुळे चमकले नशीब
ऐन वर्ल्डकपच्या तोंडावर कोचचा राजीनामा, दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलूचा कारनामा!