इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी मंगळवारी (19 डिसेंबर) दुबईत पार पडला. आयपीएल इतिहिसात पहिल्यांदाच खेळाडूंचा लिलाव भारताबाहेर आयोजित केला गेला. नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाटी मिचेल स्टार याने महत्वाची भूमिका पार पाडली होती. लिलिवात स्टार्कवर सर्वाधिक बोली लावून कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला ताफ्यात सामील केले.
आयपीएल 2024 साठी सर्व फ्रँचायजी ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर विश्वास दाखवताना दिसल्या. पॅट कमिन्स याला सनहायझर्स हैदराबाद याने 20.50 कोटी रुपयांमध्ये खेरदी केले होते. अशातच 2 कोटी बेस प्राईजसह लिलिवात उतलेलला मिचेल स्टार्क याने विक्रमी सर्व विक्रम मोडले. 24.75 कोटी रुपयांपर्यंत स्टार्कने मजल मारली. केकेआरने स्टार्कवर दाकवलेला विश्वास कितवत योग्य आहे, हे येत्या आयपीएल हंगामातच पाहायला मिळेल. मागच्या वेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी खेळणारा मिचेल स्टार्क यावेळी मात्र केकेआरच्या जर्सीत खेळताना दिसेल.
पॅट कमिन्स याला हसनरायझर्स हैदराबदाने आयपीएल इतिहिसाताली सर्वाधिक बोली लावून खरेदी केले. पण त्यानंतकर अवघ्या 90 मिनिटांच्या आत स्टार्कने हा विक्रम मोडीत काढला. वेगवान गोलंदाजावर लागलेली ही बोली नक्कीच कोणत्याही फ्रँचायझीसाठी मोठी आहे. भविष्यात देखील स्टार्कचा हा विक्रम मोडमे कोणत्याही खेळाडूसाठी सोपी गोष्ट नसेल.
We won, Mr. Starc! 💜 pic.twitter.com/twJ3VmCPDl
— KolkataKnightRiders (@KKRiders) December 19, 2023
आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे क्रिकेटर्स
२४.७५ कोटी – पॅट कमिन्स, केकेआर
२०.५० कोटी- पॅट कमिन्स,हैद्राबाद, २०२४
१८.५० कोटी- सॅम करन, पंजाब, २०२३
१७.५० कोटी- कॅमेरुन ग्रीन, मुंबई, २०२३
१६.२५ कोटी- बेन स्टॉक्स, चेन्नई, २०२३
१६.२५ कोटी- ख्रिस मॉरिस, राजस्थान, २०२१
१६.०० कोटी- युवराज सिंग, दिल्ली, २०१५
१६.०० कोटी- निकोलस पुरन, लखनऊ, २०२३
१५.५० कोटी- पॅट कमिन्स- केकेआर, २०२०
महत्वाच्या बातम्या-
IPL 2024 Auction: KKRने केएस भरतवर दाखवला विश्वास; ‘एवढ्या’ बेस प्राईजमध्ये बनला संघाचा भाग
अजब! पराभव पाकिस्तानचा पण फायदा झाला टीम इंडियाला, पाहा नक्की घडलं तरी काय!