पाकिस्तान संघ सध्या ऑस्ट्रेलिया (Pakistan tour of Australia) दौऱ्यावर आहे. त्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना यजमान ऑस्ट्रेलिया संघाने तब्बल ३५० धावांनी पराभूत केले. (Australia won first test against pakistan by 360 runs) याशिवाय संथ गतीने गोलंदाजी केल्यामुळे षटकांची गती राखता न आल्यामुळे पाकिस्तानला १० टक्के दंडही आयसीसीने ठोठावला. यामुळे त्यांचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील २ गुणही कमी करण्यात आले आहे. याच गोष्टीचा भारताला मात्र जोरदार फायदा झाला आहे.
यामुळे कापले पाकिस्तानचे गुण
ऑस्ट्रेलियातील पर्थ इथे झालेल्या सामन्यात निर्धारीत वेळेत पाकिस्तानने दोन षटके गोलंदाजी कमी केली. त्यामुळे आयसीसीने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. आयसीसीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “पाकिस्तान संघाने मर्यादीत वेळेत २ षटक कमी टाकल्यामुळे आयसीसी एलिट पॅनेल मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी संघाची १० टक्के मॅच फीस कापली आहे. मैदानावर असलेले अंपायर जोएल विलसन, रिचर्ज इलिंगवर्थ तिसरे अंपायर मायकल गॉफ आणि चौथे अंपायर डोनोवान कोच यांनी पाकिस्तान संघावर हा दंड लावला. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने आपली चूक मान्य केली आहे.” एखादी टीम दिलेल्या वेळेत आपले ओव्हर पूर्ण करू शकली नाही तर त्यांचा १ अंक कट होतो. तसेच दंड म्हणून प्रत्येक ओव्हरसाठी ५ टक्के मॅच फीस कापण्यात येते.
टीम इंडियाला झाला फायदा-
पाकिस्तानला ऑस्ट्रेलियासमोर मिळालेल्या मोठ्या पराभवाचा फायदा भारतीय संघाला देखील झाला आहे. पाकिस्तान डब्ल्यूटीसीच्या पॉईंंटस् टेबलमध्ये अव्वल स्थानावर होता. तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर. पाकिस्तानने श्रीलंकेला दोन सामन्यांच्या मालिकेत २-० पराभूत केलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियासमोर पर्थमध्ये मिळालेल्या मोठ्या पराभवानंतर पाकिस्तान संघ दुसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे, तर भारतीय संघाने आता अव्वल स्थान गाठले आहे.
बॉक्सिंग डे कसोटी सामना कधी-
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन कसोटी सामन्यातील दुसरा सामना मेलबर्न इथे २६ डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. २६ डिसेंबर रोजी सुरु होणाऱ्या कसोटी सामन्याला बॉक्सिंग डे कसोटी असेही म्हटले जाते. याच दिवशी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेला भारतीय संघ आपला पहिला सामना बोलांड पार्क, पर्लमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल. (Strange Pakistan’s defeat also benefited Team India let’s see what happened)
हेही वाचा
IPL 2024 Auction: चेन्नईने दाखवला न्यूझीलंडच्या फलंदाजावर विश्वास, एकट्यावर केले तब्बल ‘एवढे’ कोटी खर्च
हर्षल पटेलचं नशीब फळफळलं! 2 Crore बेस प्राईजचे झाले तब्बल ‘एवढे’ कोटी, पंजाबने दाखवला विश्वास