---Advertisement---

मिचेल स्टार्कचा वर्ल्ड रेकॉर्ड नेपाळच्या खेळाडूने मोडला, वनडे क्रिकेटमध्ये खळबळ!

On: मंगळवार, मे 19, 2026 12:10 PM
Sandeep Lamichhane
---Advertisement---

आयसीसी पुरूष वनडे विश्वचषक २०२७ ची पात्रता फेरी सुरू असून त्यातील एका सामन्यात विश्वविक्रम झाला आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग टू २०२३-२७ मध्ये १०७ वा सामना सोमवारी (१८ मे) नेपाळ विरुद्ध स्कॉटलंड असा खेळला गेला. यामध्ये नेपाळचा फिरकीपटू संदीप लामिछाने याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावावर असलेला विश्वविक्रम मोडला आहे.

लामिछानेने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्याने स्कॉटलंडविरुद्ध १० षटकांत ४७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या आणि ही विश्वविक्रमी कामगिरी आपल्या नावे केली. त्याने ७३ वनडे सामन्यांतच १५० विकेट्सचा टप्पा गाठला आहे. त्याआधीच स्टार्कने २०१९ मध्ये ७७ वनडे सामन्यांत ही कामगिरी केली होती आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सकलेन मुश्ताक यांना मागे टाकले होते. मुश्ताक यांनी १९९८ मध्ये ७८ सामन्यांत १५० वनडे विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

लामिछानेच्या नावावर आणखी एक विक्रम आधीच आहे. त्यानेच सर्वात जलद १०० वनडे विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. ही कामगिरी त्याने ४२ सामन्यांतच केली होती. तसेच भारताकडून मोहम्मद शमीने सर्वात जलद १५० वनडे विकेट्स (८० सामने) घेतल्या आहेत.

सर्वात जलद १५० वनडे विकेट्स (सामन्यानुसार)
७३ सामने – संदीप लामिछाने (नेपाळ)
७७ सामने – मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
७८ सामने – सकलेन मुश्ताक (पाकिस्तान)
८० सामने – रशीद खान (अफगाणिस्तान)
८० सामने – मोहम्मद शमी (भारत)

किर्तीपूरच्या त्रिभुवन युनिव्हर्सिटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्कॉटलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती. त्यांनी ३९.१ षटकांत सर्व १० विकेट्स गमावत १९४ धावसंख्या उभारली. त्यामध्ये मायकल इंग्लिशने सर्वाधिक ५१ धावा (७२) केल्या. नेपाळकडून ललित राजवंशीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याने ८ षटकांत ३२ धावा देत ही कामगिरी केली. नेपाळने ३८.१ षटकांत ४ विकेट्स गमावत यशस्वीरित्या लक्ष्याचा पाठलाग केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---