भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात गदारोळ गातल्यानंतर मिचेल स्टार्क याने दुसऱ्या वनडेत देखील भेदक गोलंदाजी केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना विशाखापट्टणम याठिकाणी खेळला जात आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या सामन्यासाठी पुन्हा संघासोबत जोडला गेला. पण ऑस्ट्रेलियन दिग्गज मिचेल स्टार्क याने या सामन्यात पावरप्लेमध्ये भारतीय संघाचा अक्षरशः घाम काढला. स्टार्कने या सामन्यातील पाच विकेट्सच्या जोरावर काही खास विक्रम नावावर केले.
भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याने 3 विकेट्स घेतल्या होत्या. पण दुसऱ्या वनडे मात्र स्टार्कच्या गोलंदाजाला अधिकच धार आल्याचे दिसले. त्याने पावरप्लेच्या 10 षटकांमध्ये भारताच्या चार विकेट्स घेतल्या. भारताने पावरप्लेमध्ये एकूण 5 विकेट्स गमावल्या. सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill), कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), आणि केएल राहुल यांच्या विकेट्स स्टार्कने घेतल्या. या चौघांनी अनुक्रमे 0, 13, 0 आणि 9 अशा धावा केल्या.
या प्रदर्शनानंतर स्टार्क भारताविरुद्धच्या वनेड सामन्यातील पावरप्लेमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन कऱणाऱ्यांमध्ये सामील झाला आहे. वनडे सामन्यात पावरप्लेमध्ये भारताविरुद्ध सर्वोत्तम प्रदर्शन शेन बॉन्ड (Shane Bond) याच्या नावावर आहे. बॉन्डने पावरप्लेमधील षटकांमध्ये 11 धावा देत भारताच्या चार विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन (Mitchell Johnson) आहे. जॉन्सनने भारताविरुद्धच्या वनडे सामन्यातील पावरप्लेमध्ये 11 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानी दिग्गज जुनेद खान (Junaid Khan) याचे नाव आहे. जुनेदने भारताविरुद्धच्या एका वनडे सामन्यात पावरप्लेमध्ये 12 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. आता या यादीत मिचेल स्टार्क (Mitchell Starc) हे नाव नव्याने जोडले गेले आहे. स्टार्कने रविवारी (19 मार्च) भारताविरुद्धच्या वनडेत पावरप्लेमध्ये 28 धावा खर्च करून 4 विकेट्स घेतल्या.
Mitchell Starc on 🔥
He has his fourth as KL Rahul walks back. #INDvAUS | 📝 Scorecard: https://t.co/5ISBBNMhiZ pic.twitter.com/e81rUMqido
— ICC (@ICC) March 19, 2023
वनडे सामन्याच्या पावरप्लेमध्ये भारताविरुद्ध सर्वोत्तम प्रदर्शन करणारे गोलंदाज
4/11 – शेन बॉन्ड
4/11 – मिचेल जॉन्सन
4/12 – जुनेद खान
4/28 – मिचेल स्टार्क*
ऑस्ट्रेलियन संघासाठी शेवटची विकेट देखील स्टार्कनेच घेतली. मोहम्मद सिराजला स्टार्कने शुन्यावर क्लीन बोल्ड केले आणि भारतीय संघालाचा डाव गुंडाळला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 26 एकूण 117 धावा केल्या. विजयासाठी ऑस्ट्रेलियाला अवघ्या 118 धावांचे लक्ष्य मिळाले.
(Mitchell Starc’s name has been added to the list of best performers against India in ODI Powerplay)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्मिथने चित्त्याच्या चपळाईने घेतला कॅच, ऑस्ट्रेलियन कर्णधाराची लवचिकता पाहून रोहित अवाक
नजम सेठींची आश्चर्यकारक माहिती, ‘या’ बाबतीत पीएसएलने आयपीएलला टाकले मागे?