नुकत्याच पार पडलेल्या महिला टी20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाला उपांत्य सामन्यात इंग्लंड विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात भारताच्या 11 जणींच्या संघात भारताची अनुभवी फलंदाज मिताली राजला संधी मिळाली नव्हती. त्यामुळे अनेकांनी भारताची टी20 कर्णधार हरमनप्रीतवर टीका केली होती. पण आता मितालीनेच या प्रकरणाबाबत मोठा खूलासा केला आहे.
तिने बीसीसीआयचे सीइओ राहुल जोहरी यांना पत्र लिहिले असून यामध्ये तीने या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देताना भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर अपमानास्पद वागणूकीचा आणि भेदभाव करण्याचा आरोप केला आहे.
याचबरोबर तीने सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेली समिती (सीओए) सदस्य डायना एडुलजी यांच्यावरही भेदभावाचा आरोप केला आहे.
तसेच हरमनप्रीत कौरशी कोणतेही वाद नसल्याचेही स्पष्ट करताना तिने पत्रात म्हटले आहे की ‘मला सांगावेसे वाटते की टी20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मला 11 जणींच्या संघात स्थान न देण्याच्या प्रशिक्षकांच्या निर्णयाला पांठीबा देणे दु:खदायक होते. पण त्याव्यतिरिक्त तिच्याशी कोणतेही वाद नाही.’
‘मला माझ्या देशासाठी विश्वचषक जिंकायचा होता आणि मी ही सुवर्णसंधी गमावल्याचे मला जास्त वाईट वाटत आहे.’
त्याचबरोबर तिने डायना एडुलजी यांच्याबद्दल म्हटले आहे की, ‘मी नेहमीत डायना एडुलजी यांच्यावर विश्वास ठेवला आणि नेहमीच त्यांचा आणि त्यांच्या पदाचा आदर केला आहे. पण मी कधी विचार केला नव्हता की त्या त्यांच्या पदाचा माझ्याचविरुद्ध वापर करतील.’
‘त्यांनी पत्रकार परिषदेत मला उपांत्य सामन्यात न खेळवण्याच्या निर्णयाला दिलेला पांठींबा त्रासदायक होता. कारण त्यांना सर्व तथ्य गोष्टी माहिती होत्या.’
त्याचबरोबर मितालीने म्हटले आहे की, ‘मला कल्पना आहे की हे पत्र लिहिणे माझ्यासाठी आणखी धोकादायक आहे. कारण एडुलजी या सीओए सदस्य आहेत आणि मी फक्क एक खेळाडू आहे. मी उपांत्य सामन्याआधी सलग दोन अर्धशतके केली होती आणि दोन्हीवेळेस मला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूम्हणून पुरस्कारही मिळाला होता. ‘
‘त्यामुळे मला बाहेर ठेऊन फक्त चांगली कामगिरी करणाऱ्या तीन फलंदाजांना संघात स्थान देणे जसे जगासाठी आश्चर्यकारक होते तसेच माझ्यासाठीही होते.’
मितालीने प्रशिक्षक रमेश पोवार यांच्याबद्दल म्हटले आहे की ‘मी कुठेही बसले असले तरी ते दूर निघून जायचे. नेटमध्ये सराव करतानाही बाकीच्यांच्या फलंदाजीकडे लक्ष द्यायचे. पण मी जेव्हाही फलंदाजी करायचे तेव्हा ते निघून जाणे पसंत करायचे.’
‘मी जेव्हापण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा ते एकतर त्यांच्या फोनमध्ये पहायचे आणि निघून जायचे. माझ्यासाठी हे खूप लाजिरवाणे आणि आपमानास्पद होते. पण अजूनही मी कधी माझी शांतता सोडली नाही.
मितालीने या पत्रात असेही म्हटले आहे की तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मला निराश वाटले. ती म्हणाली, ’20 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मला संकुचित, निराश वाटले. त्यामुळे मला असे विचार करणे भाग पडले आहे की सत्तेत असणाऱ्या काही लोकांसाठी मी देशासाठी केलेल्या सेवेला काही किंमत आहे की नाही, ते मला उद्धस्त करण्याचा आणि माझा आत्मविश्वास संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.’
या प्रकरणानंतर मिताली आणि हरमनप्रीत कौरने बीसीसीआय सीइओ राहुल जोहरी यांचीही भेट घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–वाढदिवस विशेष: टी२० स्टार सुरेश रैनाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?
–या कारणामुळे टीम इंडियाला कसोटीतील अव्वल स्थान कायम राखण्याचे आव्हान