भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ यांच्यात झालेला एकमात्र कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. त्यानंतर आता भारतीय महिला संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी (२७ जून ) पार पडला. पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज अर्धशतक झळकावून आगळ्या-वेगळ्या प्रकारे बाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून पाहुण्या भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाचा स्वीकार करत भारतीय संघाने ५० षटकांच्या समाप्तीनंतर ८ बाद २०१ धावा उभारल्या होत्या. या डावात कर्णधार मिताली राजने अर्धशतकी खेळी केली. तसेच पुनम राऊतने ३२ धावांचे योगदान दिले .इंग्लंड संघाकडून गोलंदाजी करताना सोफी एक्लेस्टोनने ४० धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या होत्या.(Mithali raj got out after hitting fifty cricket lovers were shocked)
आगळ्या वेगळ्या प्रकारे बाद झाली कर्णधार मिताली राज
चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेली कर्णधार मिताली राज हीने ७ चौकार मारत ७२ धावांची खेळी केली. परंतु ती ज्याप्रकारे बाद झाली, ते पाहून क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला असेल. पहिल्या डावातील ४६ व्या षटकात सोफी एक्लेस्टोनने टाकलेल्या तिसऱ्याच चेंडूवर मिताली राज त्रिफळाचीत झाली. सोफी एक्लेस्टोनने सरळ चेंडू टाकला, परंतु तो चेंडू आतल्या दिशेने आला आणि मितालीची नजर चुकवून तो चेंडू यष्टी उधळून निघून गेला.
The 🐐
Scorecard & Videos: https://t.co/MyGWEzUJrk#ENGvIND pic.twitter.com/3HhTC0jHnO
— England Cricket (@englandcricket) June 27, 2021
इंग्लंड संघाने ८ विकेट राखून मिळवला विजय
इंग्लंड संघाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी २०२ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना, टेमी ब्युमोंटने नाबाद ८७ धावांची खेळी केली होती. तर नताली स्कायव्हरने नाबाद ७४ धावांची खेळी केली होती. या खेळींच्या जोरावर इंग्लंड संघाने ८ गडी आणि ९१ चेंडू शिल्लक असतानाच सामना जिंकला.
महत्वाच्या बातम्या-
सतत फ्लॉप ठरत असलेल्या श्रीलंकन क्रिकेटपटूंवर चाहत्यांचा संताप; उचलले ‘हे’ मोठे पाऊल