भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार सध्या प्रत्येक सामन्यात रोज नवीन विश्वविक्रमांना गवसणी घालत आहे. काल भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात तिने अशाच एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
मिताली राज भारताकडून आजपर्यँत १८० एकदिवसीय सामने खेळली असून त्यात तब्बल १०४ सामन्यात भारताला विजय मिळाला आहे. सर्वाधिक वेळा विजयी संघाचा भाग असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मिताली याबरोबर दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. १०४ पैकी ६४ विजय हे तिने कर्णधार म्हणून मिळवले आहेत हे विशेष.
सध्या सर्वाधिक वेळा विजयी संघाचा भाग असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी आहे ती ऑस्ट्रेलियाची कारेन रोलटोन. ती संघात असताना १४१ सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल १०८ विजय मिळवले आहेत.