---Advertisement---

‘कित्येक पिढ्यात एकदाच असे खेळाडू जन्माला येतात’, मितालीकडून शेफालीचे भरभरून कौतुक

On: सोमवार, जुलै 25, 2022 11:16 PM
Mithali-Raj
---Advertisement---

भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी बर्मिंघमला गेला आहे. या संघात युवा विस्फोटक फलंदाज शेफाली वर्मा हिचाही समावेश आहे. शेफाली भारताच्या महिला संघातील प्रतिभाशाली क्रिकेटपटूंपैकी एक आहे. याच शेफालीची माजी कर्णधार मिताली राज हिने तोंडभरून प्रशंसा केली आहे. शेफाली कित्येक पिढ्यांमध्ये एकदाच येणारी खेळाडू आहे, जिच्यात कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध एकटीच्या बळावर विजय मिळवून देण्याची क्षमता असल्याचे मितालीने म्हटले आहे.

आयसीसीच्या १०० परसेंट क्रिकेट पॉडकास्टवर मिताली बोलत होती. ती म्हणाली की, “मी शेफालीच्या खेळाची खूप मोठी प्रशंसक आहे. मी पाहिले आहे. तिच्यात कोणत्याही खेळाडूच्या प्रहाराविरोधात किंवा कोणत्याही संघाविरुद्ध भारतीय संघाला एकटीच्या बळावर विजय मिळवून देण्याची क्षमता आहे.”

“मी तिला पहिल्यांदा भारतीय रेल्वे संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळताना पाहिले होते. त्यावेळी तिने भारतीय रेल्वे संघासाठी अर्धशतक ठोकले होते. परंतु तेव्हाच मी तिच्यात एका अशा खेळाडूची झलक पाहिली होती, जी फक्त तिच्या एका खेळीने संपूर्ण सामन्याचा कायापालट करू शकत होती. तसेच महिला टी२० चॅलेंज ट्रॉफीच्या पहिल्या हंगामातही मी तिच्या खेळाला जवळून पाहिले. ती माझ्या नेतृत्त्वाखालील व्हेलॉसिटी संघाचा भाग होती. तिच्यात इतक्या कमी वयात इतकी क्षमता आणि ताकद आहे. फार कमी वेळा असे पाहायला मिळते. सीमारेषेबाहेर फटके मारण्याची क्षमता आणि आपल्या इच्छेनुसार चेंडू षटकारासाठी पाठवण्याची तिच्यातील क्षमता जबरदस्त आहे”, असेही पुढे मितालीने म्हटले.

दरम्यान शेफाली आता तर १८ वर्षांची असून ती भारताच्या महिला वनडे संघाचा महत्त्वाचा भाग बनली आहे. तिने १८ वनडे सामने खेळताना ३०.७०च्या सरासरीने ५२२ धावा केल्या आहेत. यादरम्यान तिच्या बॅटमधून ४ अर्धशतके निघाली आहेत. याखेरीज ३२ टी२० सामने खेळताना तिने ७५३ धावा केल्या आहेत. कॉमनवेल्थ गेम्सवेळीही तिच्या प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष असेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

“तो वनडेचा दिग्गज बनतोय”; माजी भारतीय खेळाडूची श्रेयसवर स्तुतीसुमने

धक्कादायक! स्कॉटलँड क्रिकेट बोर्डाच्या सर्व सदस्यांचा एकदाच राजीनामा, कारण आहे गंभीर

गॉल कसोटीवर श्रीलंकेची घट्ट पकड; दुसऱ्या दिवसावर पूर्णपणे यजमानांचे वर्चस्व

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---