पुणे, 14 ऑगस्ट, 2023: एक्सलंस चेस अकादमी यांच्या वतीने आयोजित किंग्ज इंडियन चेस क्लब,एनबीएम व चेसलव्हर्स ग्रुप यांचा पाठिंबा लाभलेल्या पहिल्या जेके ईसीए फिडे रेटिंग रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत कोलकत्ताच्या मित्रभा गुहा याने विजेतेपद संपादन केले.
सिंहगड रोड येथील कोद्रे फार्म येथे पार पडलेल्या या स्पर्धेत नवव्या फेरीत मित्रभा गुहाला विष्णू प्रसन्न व्हीकडून पराभव स्वीकारावा लागला. पण मित्रभा याने बुकोल्स कट 53 गुणसरासरीच्या जोरावर विजेतेपदावर आपले नाव कोरले. तर, आंतरराष्ट्रीय मास्टर कुशाग्र मोहन याने बुकोल्स कट 51 गुणसरासरीवर दुसरा आणि फिडे मास्टर शरण रावने तिसरा क्रमांक पटकावला.
विष्णु प्रसन्ना व्ही व जगदीश पी यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकावला. स्पर्धेत एकूण 4,00,000/- रुपयांची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेतील विजेत्या मित्रभा गुहा याला करंडक व 50000रूपये, तर उपविजेत्या कुशाग्र मोहनला करंडक व 35000रूपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे मानद सचिव निरंजन गोडबोले, पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेच्या संचालिका जुईली कुलकर्णी, सोलापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सुमुख गायकवाड, प्रवीण ठिपसे, चीफ आरबीटर राजेंद्र शिदोरे, डेप्युटी चीफ आरबीटर दिप्ती शिदोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: नववी फेरी: व्हाईट व ब्लॅक यानुसार:
विष्णू प्रसन्न व्ही(8गुण)वि.वि.मित्रभा गुहा(8गुण);
कुशाग्र मोहन (8गुण)वि.वि.केवल निर्गुण (7गुण);
शरण राव (8 गुण)वि.वि.अविरत चौहान (7 गुण);
सुभाष केव्ही (7गुण) पराभुत वि.जगदीश पी (8गुण);
आदित्य सावळकर (7गुण) पराभुत वि.विक्रमादित्य कुलकर्णी(7.5 गुण);
दिपन चक्रवर्ती जे.(7गुण) बरोबरी वि.वीरेश शरनार्थी (7गुण);
साहिल धवन (6.5गुण) पराभुत वि.रत्नाकरन के.(7.5गुण);
श्रायान मजुमदार (7.5गुण)वि.वि.आर्यन देशपांडे (6.5 गुण)
रेयान एमडी (6.5गुण) पराभुत वि.कशिश जैन (7गुण);
कार्तिकेयन पी(7गुण)वि.वि.सौरभ म्हामणे(6गुण);
अंकुर गोखले (6 गुण) पराभुत वि.ऋत्विज परब(7 गुण);
आदित्य गाम्पा (7गुण) वि.वि.यश वाटरकर (6 गुण);
अक्षय बोरगावकर (7 गुण) वि.वि.प्रशांत नाईक (6 गुण);
गौरव झगडे (6.5 गुण) बरोबरी वि.मिहीर शहा (6.5गुण);
मानस गायकवाड (6गुण) पराभुत वि.रित्विक कृष्णन (7 गुण);
अनिरुद्ध देशपांडे (7 गुण) वि.वि.प्रदीप सुथर (6 गुण);
प्रज्वल आव्हाड (6 गुण) पराभुत वि.मंदार लाड(7 गुण) पराभूत;
पवन बीएनबी (7गुण)वि.वि. मिहिर सरवदे(6गुण);
अमेय गोडबोले (6गुण) पराभुत वि.इंद्रजीत महिंद्राकर(7 गुण);
बालकिशन ए.(7गुण)वि.वि.हर्ष घाडगे(6गुण).
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! स्टोक्स वनडे निवृत्ती मागे घेणार? आयपीएलबाबत घेणार कठोर निर्णय
प्रतीक्षा संपली! दक्षिण आफ्रिकेच्या वरिष्ठ संघात डेवाल्ड ब्रेविसची निवड, बलाढ्य देशाविरुद्ध खेळणार मायदेशातील मालिका