ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा वनडे आणि टी-20 संघ सोमवारी (14 ऑगस्ट) घोषित केला गेला. 30 ऑगस्ट रोजी उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. तसेच 7 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सचा 20 वर्षी खेळाडू डेवॉर्ड ब्रेविस याला पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या वरिष्ठ संघात निवडले गेले असून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी देखील मिळू शकते.
दक्षिण आफ्रिका संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या दोन्ही मालिका मायदेशात खेळायच्या आहेत. वनडे संघाचे कर्णधारपद टेंबा बावुमा (Temba Bavuma) याच्याकडे, तर टी-20 संघाचा कर्णधार एडेन मार्कराम (Aiden Markram) आहे. डोनोव्हन फरेरा, गेराल्ड कोएत्झी आणि मॅथ्यू ब्रेट्झके यांना पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 संघात सामील करण्यात आले आहे. दुसरीकडे वनडे संघात डेविड मिलर, क्विंटन डी कॉक, हेनरिक क्लासेन आणि कागिसो रबाडा आणि रासी वॅन डर ड्युसेन या वरीष्ठ खेळाडूंना सामील केले गेले आहे. उभय संघातील टी-20 मालिका 3 सप्टेंबर, तर वनडे मालिका 12 सप्टेंबर रोजी संपेल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेला दक्षिण आफ्रिकेचा टी-20 संघ –
एडेन मार्कराम (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, टेम्बा बावुमा, मॅथ्यू ब्रेट्झके, डेवॉल्ड ब्रेविस (Dewald Brevis), गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, ब्योर्न फॉर्च्युइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, सिसांडा मागाला, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, सेंट ट्रिब्स, ट्रायझब्स लिझाद विल्यम्स.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेला दक्षिण आफ्रिकेचा वनडे संघ –
टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर डुसेन, क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी, वेन पारनेल, कागिसो रबाडा, डेवाल्ड ब्रेव्हिस, गेराल्ड कोएत्झी, ब्योर्न फॉर्च्युन, मार्यॉन्ड्रिक्स, रेन्को, रेन , हेनरिक क्लासेन, सिसांडा मगाला, केशव महाराज, स्ट्रीस्टन स्टब्स.
(Dewald Brevis included in the South Africa ODI & T20I team for Australia series.)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! श्रीलंकन क्रिकेटपटू अडचणीत, मॅच फिक्सिंग प्रकरणात न्यायलायाची मोठी कारवाई
INDvsWI: ‘आता कारणं देऊ नका’, भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने साधला निशाणा