पुणे: अखिल भारतीय स्पोर्ट्स काउन्सिल ऑफ द डेफ आणि चेन्नई स्पोर्ट्स काउन्सिल ऑफ द डेफ यांच्यातर्फे आयोजित चेन्नई येथे आयोजित तेविसाव्या राष्ट्रीय वरिष्ठ मुकबधीर चॅम्पियनशिपमध्ये एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नालॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर येथील इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी अनिरुद्ध खांटे याने जलतरण स्पर्धेच्या सर्व प्रकारात ६ सुवर्ण आणि १ रौप्य पदक जिंकत महाराष्ट्रातर्फे सर्वसाधारण विजेता पदकावरही आपले नाव कोरले.
एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड, कुलगुरू डॉ. सुनील राय, कुलसचिव शिवशरण माळी, इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचे अधिष्ठाता प्रा. अनंत चक्रदेव, क्रीडा संचालक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. पद्माकर फड यांनी या खेळाडूचे अभिनंदन केले.
एमआयटी-एडीटी विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचा विद्यार्थी अनिरुद्ध खांटे नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या तेविसाव्या राष्ट्रीय वरिष्ठ मुकबधीर चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्रातर्फे जलतरण स्पर्धेत सहभागी झाला होता. जलतरणाच्या ५०, १०० आणि २०० मीटर बॉक स्ट्रोक प्रकारात सुवर्ण, चार बाय ५० मीटर फ्रीस्टाईल रिले, चार बाय ५० मीटर मिडले रिले आणि चार बाय ५० मीटर फ्रीस्टाईल मिक्स्ड रिले प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. तसेच ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्य पदक जिंकत एकूण ७ पदकावर आपले नाव कोरले.