अलीकडच्या काळात आपल्या वादळी फलंदाजीमुळे जगभरात ख्याती मिळवणारा नवखा खेळाडू कोण असेल? तर तो आहे मुंबई इंडियन्स संघाचा फलंदाज ‘सूर्यकुमार यादव’. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याने केलेली अनोखी फटकेबाजी. गुडघ्यावर बसून स्लॉगस्वीप मारणे, यष्टीरक्षकाच्या डोक्यावरुन गेलेले शानदार शॉट, कोणताही खेळाडू नसलेल्या क्षेत्रात फटकेबाजी करण्यात तो तरबेज आहे. त्यामुळे शुक्रवारी (9 एप्रिल)ला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला मुंबई इंडियन्सच्या या दिग्गज फलंदाजाला रोखण्याकरीता एक विशेष रणनीती बनवावी लागणार आहे.
खरे तर, सूर्यकुमारच्या या फटकेबाजी करण्याच्या त्याच्या फलंदाजी शैलीने त्याला एक वेगळंच आकर्षण दिलं आहे. त्याची खेळाची गुणवत्ता वाढली असून तो आता ‘360 डिग्री’चा फलंदाज तयार झाला आहे. 360 फलंदाज म्हणजे मैदानात कोठेही आणि कोणत्याही दिशेला फटकेबाजी करणारा फलंदाज. शुक्रवारी (09 एप्रिल) खेळल्या जाणार्या पहिल्या आयपीएल सामन्यात सुर्यकुमार यादव हा आरसीबी गोलंदाजांसमोर एक मोठे आव्हान ठरणार आहे. कारण पहिल्याच चेंडूपासून फटकेबाजी करायला त्याला आवडते.
नुकतेच इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत त्याने 3 सामन्यात 185.41 च्या स्ट्राईट रेटने आणि 44.50 च्या सरासरीने 89 धावा केल्या होत्या. त्यामध्ये त्याची 57 ही सर्वोत्तम धावसंख्या होती. या कामगिरीसह त्याने जगभरातील गोलंदाजांना आपल्या तडाखेबाज फलंदाजीची चुणूक दाखवली.
https://twitter.com/cricketbrother/status/1380086478097637376?s=20
युएईमध्ये झालेल्या मागील आयपीएल पर्वात त्याने शानदार कामगिरी केली होती. या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये सातव्या स्थानावर होता. त्याने मुंबई संघासाठी 16 सामन्यांपैकी 15 सामन्यांमध्ये 40.00 च्या सरासरीने 480 धावा केल्या होत्या. तसेच स्ट्राइक रेटच्या यादीत अव्वल दहा फलंदाजांमध्ये 145.01 च्या स्ट्राइक रेटने तो तिसर्या क्रमांकावर होता.
महत्त्वाच्या बातम्या-
आरसीबीविरुद्ध फक्त २ खणखणीत षटकार आणि पोलार्ड ठरेल ‘हा’ विक्रम करणारा दुसराच मुंबईकर
‘पन्नास खेळाडू मिळूनही पंतसारखी फलंदाजी करु शकत नाहीत,’ जगातील अव्वल गोलंदाजाने केली स्तुती
ब्रेकिंग! चेन्नई सुपर किंग्जला मिळाला जोश हेजलवुडचा पर्याय, ‘या’ खेळाडूला केले ताफ्यात सामील