---Advertisement---

एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पीवायसी 4, टेनिस नट्स संघांची विजयी सलामी

On: रविवार, एप्रिल 10, 2022 4:18 PM
Action-photo-of-Sangram-Patil-and-Sanjay-Bothara-of-PYC-4
---Advertisement---

पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी 4, टेनिस नट्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत चुरशीच्या लढतीत संग्राम पाटील, संजय बोथरा,रोहन जमेनिस, अभिजीत खानविलकर, कल्पक पत्की यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी 4 संघाने सोलारिस गोगेटर्स संघाचा 17-16 असा संघर्षपूर्ण पराभव केला. दुसऱ्या सामन्यात टेनिस नट्स संघाने पीवायसी 3 संघाचा 24-03 असा पराभव करून शानदार सुरुवात केली.

याआधी स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, क्लबचे मानद सचिव सारंग लागू, राज्याच्या वित्तीय विभागा(एक्सपेंडिचर)चे मुख्य सचिव ओ. पी.गुप्ता, महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे आणि एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसीच्या टेनिस विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे, प्रशांत सुतार, स्वर्गीय एसपी गोसावी यांचा मुलगा हिमांशू गोसावी, किशोर पाटील, नंदन बाळ आणि गोसावी कुटुंबातील सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: साखळी फेरी:
पीवायसी 4 वि.वि.सोलारिस गोगेटर्स 17-16(100अधिक गट: संग्राम पाटील/संजय बोथरा वि.वि.सुबोध पेठे/आश्विन हळदणकर 6-1; 90 अधिक गट: पराग चोपडा/अमोल काणे पराभूत वि.अमोल गायकवाड/महेंद्र गोडबोले 4-6; खुला गट: रोहन जमेनिस/संग्राम पाटील वि.वि.सुबोध पेठे/आनंद परचुरे 6-3; खुला गट: अभिजीत खानविलकर/कल्पक पत्की वि.वि.शिव जावडेकर/संतोष दळवी 1-6);

टेनिस नट्स वि.वि.पीवायसी 3 24-03(100 अधिक गट: रवी कोठारी/एस भट वि.वि.चारू साठे/केदार नाडगोंडे 6-0; 90 अधिक गट: अमित किंडो/सुधीर पिसाळ वि.वि.भाग्यश्री देशपांडे/अजिंक्य मुथे 6-3; खुला गट: जॉय बॅनर्जी/रवी कोठारी वि.वि.अमित महाजनी/शैलेश लिमये 6-0; खुला गट: अंकित कापसे/नितीन सावंत वि.वि.केदार नाडगोंडे/अभिजीत शहा 6-0).

महत्त्वाच्या बातम्या – 

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबई ‘पलटण’ने आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच घेतला ‘हा’ निर्णय, तरीही पराभव साथ सोडेना

भावंड दिवस: आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या

‘हॅल्लो’ ब्रदर! दोन सख्या भावांनी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या संघाकडून केले होते वनडे पदार्पण, वाचा काय आहे यामागची स्टोरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---