येत्या काही दिवसात बीसीसीआयच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना सुरुवात होणार आहे. २८ सप्टेंबरपासून विनू मंकड स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. परंतु ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे.
विनू मंकड स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच बंगालचे माजी गोलंदाज आणि मिझोरामच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक मुर्तजा लोधगर यांचे निधन झाले आहे. ते विशाखापट्टणममध्ये संघासोबत होते. जिथे त्यांना शुक्रवारी (१७ सप्टेंबर) रात्री जेवणानंतर हृदयविकाराच्या झटक्यामुळे जगाचा निरोप घेतला.
क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष अविशेक दालमिया यांनी या वृत्ताची पुष्टी केली आहे. त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की ही घटना रात्रीचे जेवण झाल्यानंतर ही दु:खद घटना घडली.
त्यांनी पुढे म्हटले की, “मुर्तजा संघाच्या फीजिओसोबत रात्रीचे जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी बाहेर निघाले होते. त्यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले आणि ते जमिनीवर पडले. त्यानंतर फीजिओ आणि संघातील इतर सदस्यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात घेऊन गेले. पण रुग्णालयात गेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.”
त्यांचा मृत्यू झाल्याचे पाहून डालमीया यांनी म्हटले की, “मला अजूनही विश्वास होत नाहीये की मुर्तु भाई आता नाही राहिले. हे माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान आहे. ते आमच्यावेळी सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक होते. त्यांनी आमच्या महिला संघासोबत देखील काम केले आहे.”(Mizoram u19 head coach Murtaza lodghar dies in vizag)
Gone way to early my friend…. #RIPMurtazaLodghar pic.twitter.com/QbKOAa7Voi
— Deep Dasgupta (@DeepDasgupta7) September 17, 2021
त्यांच्या मृत्यूनंतर बंगालचे माजी कर्णधार दीप दासगुप्ता यांनी ट्विट केले की, “माझे मित्र खूप लवकर सोडून गेले.”
बंगाल संघ त्यांचे शव घेऊन शनिवारी (१८ सप्टेंबर) विजागला रवाना होणार आहे. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांनी ३४ गडी बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१ मध्ये ऑरेंज कॅप जिंकण्यासाठी ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रमुख दावेदार, पाहा नावे
‘थाला’चा सराव सत्रात धूमधडाका, ठोकला कडक हेलिकॉप्टर शॉट; मुंबईकरांची वाढली असेल धडधड!
झिम्बाब्वेचा दुसऱ्या टी२०त सनसनाटी विजय, अंतिम षटकात स्कॉटलंडच्या घेतल्या ४ विकेट्स