मध्य रेल्वे, मुंबई बंदर, महाराष्ट्र पोलीस, भारत पेट्रोलियम यांनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली.
प्रभादेवी येथील मुरारी घाग मार्ग येथे मॅटवर झालेल्या उदघाटनिय अ गटाच्या सामन्यात मध्य रेल्वेने देना बँकेला ४६-३६असे पराभूत करीत विजयी सलामी दिली.
मध्यांतरापर्यंत अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात २१-१८अशी छोटी आघाडी रेल्वेकडे होती. श्रीकांत जाधव, गुरुविंदर यांच्या चढाया, तर अतिश धुमाळ याच्या पकडी याला या विजयाचे श्रेय जाते. पंकज मोहिते,नितीन देशमुख यांच्या चढाया, अशोक गोजारे याच्या पकडीचा खेळ बँकेचा पराभव टाळण्यास कमी पडला.
ब गटातील दुसऱ्या सामन्यात मुंबई बंदरने एअर इंडिया या बलाढ्य संघाला ५१-४३ असे पाणी पाजले.मध्यांतराला १८-२४असे पिछाडीवर पडलेल्या एम पी टी ने नंतर मात्र जोरदार खेळाचे प्रदर्शन करीत हा विजय खेचून आणला.
दीपक गिरी,शिवराज जाधव यांच्या धारदार चढाया त्याला गणेश डेरंग, शुभम कुंभार यांच्या भक्कम पकडी यांना या विजयाचे श्रेय जाते. उमेश म्हात्रे, मोनू, सिद्धार्थ देसाई यांचा पूर्वार्धातील जोश नंतर दिसला नाही.
क गटात महाराष्ट्र पोलिसने बँक ऑफ इंडिया ला ३५-३१ असे तर ड गटात भारत पेट्रोलियमने युनियन बँकेला ३५-१९असे पराभूत करीत आगेकूच केली.
या स्पर्धेचे उदघाटन मुंबईचे प्रथम नागरिक प्रिन्सि. विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अनिल देसाई, आमदार विभागप्रमुख सदा सरवणकर, मुं. शहर संघटनेचे सचिव विश्वास मोरे यांच्या उपस्थितीत पार पडले.
महत्त्वाच्या बातम्या –
–तब्बल दोन दिवसांनी सापडला एबी डीविलियर्सने मारलेला त्या षटकाराचा चेंडू
–भारत पाकिस्तान सामन्यासाठी असे आहेत तिकीटांचे दर
–पहा व्हिडीओ- सिक्सर किंग जेव्हा आजमावतो स्टंपमागे नशीब
–आयपीएल होणारच, पण भारतात नाही तर या देशात!
–आयपीएलमध्ये पहिल्यांदाच जुळून आला असा योगायोग
–भारतीय संघातील या दोन मित्रांचं मराठीतील संभाषण नक्की पहा
–कसोटी क्रिकेट चाहत्यांसाठी हे आहे नाराज करणारे वृत्त
– सामना पराभूत झाला म्हणून काय झाले, त्याने जिंकली चाहत्यांची मने
–टाॅप ७- आयपीएलमध्ये या खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद, संघाचे पुढे काय झाले पहाच
–आमदार चषक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया सलामीलाच कोलमडली