मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या मालकिचा संघ एमआय न्यू यॉर्क यांनी मेजर लीग 2023चे विजेतेपद दिमाखात पटकावले. कर्णधार निकोलस पूरन यांच्या झंजावातामुळे एमआय न्यू यॉर्कसाठी हा विजय अदगी सोपा झाल्याचे पाहायला मिळाले. पूरनने 137 धावांची नावाद खेळी करत अंतिम सामन्यात एमआयला विजय मिळवून दिला आणि सामनावीर ठरला. विजयानंतर आनंद साजरा करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.
एममआय न्यू यॉर्क (MI New York) संघाला अंतिम सामन्यात विजयासाठी सिएटल ऑर्कास (Seattle Orcas) संघाकडून 184 धावांचे लक्ष्य मिळाले होते. निकोलस पूरन (Nicholas Pooran) याने 55 चेंडूत 137* धावा केल्यामुळे एमआयने हे लक्ष्य अवघअया 16 षटकात आणि 7 विकेट्स राखून गाठले. सामन्यातील जबरदस्त कामगिरीसाठी पूरनला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. राशिद खान (Rashid Khan) आणि ट्रेंट बोल्ट (Trent Boult) यांनीही संघाला विजय मिळवून देण्यासाठी महत्वापूर्ण योगदान दिली. या दोन्ही गोलंदाजांनी एमआयसाठी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या आणि विरोधी संघाच्या धावसंख्येला आळा घातला.
अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर निकोलस पूरन खेळपट्टीवर खाली झोपल्याचे पाहायाला मिळाले. आनंदाच्या भरात तो मोठ्याने ओरडत देखील होती. नॉन स्ट्राईकवरील टिम डेविडने त्याला उचलून आपल्या खांद्यावर देखील घेतले. विजयानंतर संघातील इतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ देखील खेळपट्टीवर धावत आला. एमएसलीच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला गेलेला हा व्हिडिओ सद्या चांगलाच व्हायरल होत आहे.
The winning moment of MI New York.
The GOAT franchise – MI.pic.twitter.com/euhcLY1r5h
— Johns. (@CricCrazyJohns) July 31, 2023
दरम्यान, मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने जिंकलेले हे नववे विजेतेपद आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला विक्रमी पाच वेळा ट्रॉफी जिंकता आली आहे. एमएलसीचा हा पहिला हंगाम असून, मुंबई इंडियन्यच्या एमआय न्यू यॉर्क संघाने जबरदस्त प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले आहे. (MLC 2023 । The winning moment of MI New York.)
महत्वाच्या बातम्या –
देवधर ट्रॉफी: दक्षिण विभागाची अंतिम फेरीत धडक, दुबेच्या धडाक्याने पश्चिम विभागाचे आव्हान जिवंत
BREAKING! मुंबई इंडियन्सने जिंकली नववी ट्रॉफी! फायनलमध्ये कर्णधार पूरनची 137* रन्सची वादळी खेळी